Kerosene
Kerosene 
पुणे

रॉकेलसाठी आता हमीपत्र बंधनकारक

सकाळवृत्तसेवा

पुणे - गॅस सिलिंडरची जोडणी नसलेल्या कुटुंबानाच रॉकेलचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांना कुटुंबातील कोणाच्याही नावावर गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. त्याची खात्री करूनच रास्त धान्य दुकानदारांनी रॉकेलचे वाटप करावे, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील गाढे यांनी दिले आहेत. 

पुणे शहर संपूर्ण रॉकेलमुक्‍त करण्यात आले आहे. परंतु, जिल्ह्यातील ग्रामीण भागात रॉकेल वितरीत केले जाते. 

पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी दिल्यानंतर घरगुती वापराच्या निळ्या रॉकेलच्या वापरावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. काही ठिकाणी गॅस जोडणी असूनही लाभार्थी हे शिधापत्रिकेवर गॅस जोडणीचा शिक्‍का मारू देत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे पुरवठा विभागाकडून गॅस जोडणी असलेल्या कुटुंबांना रॉकेल न देण्याच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. रॉकेल विक्री करणाऱ्या दुकानदारांकडे दिलेली हमीपत्रे तपासण्यात येणार आहेत. रॉकेलसंदर्भात खोटे हमीपत्र देणाऱ्या लाभार्थ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 

पुणे जिल्ह्यातील रॉकेल 
लाथार्थींची संख्या :      एक लाख ८० हजार ३२६
रॉकेल वितरण :    ४९२ किलोलिटर
रॉकेल विक्रेते :     २५१२

आधार नोंदणी न झालेल्या काही कुटुंबांना पॉस मशिनशिवाय रॉकेल दिले जाते. पॉस मशिनद्वारे आणि मशिनशिवाय रॉकेलचे वितरण करताना हमीपत्र घेणे बंधनकारक आहे. सरकारने गॅस जोडणी असलेल्या कुटुंबांना कोणत्याही स्थितीत रॉकेलचे वाटप न करण्याचे आदेश दिले आहेत. 
- अनिल कारंडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT