Now uniform stamp duty On equitable and simple mortgage 
पुणे

इक्विटेबल व सिंपल मॉर्गेजवर आता एकसमान स्टॅम्प ड्यूटी 

सकाळवृत्तसेवा

पुणे : इक्‍विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज (साधे गहाणखत) या दोन्हींवर आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्यूटी आता एकसारखी करण्याचा निर्णय नोंदणी व मुदांक शुल्क विभागाने घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यास मान्यता मिळाली नंतर दोन्ही प्रकाराच्या गहाणखतासाठी 0.3 टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गहाणखताचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी ईक्‍विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज यांचा सर्वाधिक वापर होतो. परंतु त्यासाठी वेगवेगळी स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते. इक्विटेबल मॉर्गेजसाठी सध्या 0.2 टक्के, तर सिंपल मॉर्गेजसाठी 0.3 टक्के स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते. अनेकदा त्यामुळे नागरिकांना गोंधळ होतो. त्यातून वारंवार लोकांना सब रजिस्टर कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. दरवर्षी अशा प्रकारचे सुमारे पाच ते सहा लाख गहाणखताचे व्यवहार होतात. या दोन्ही मॉर्गेजमधील गोंधळ दूर करून त्यामध्ये सुटसुटीतपणा आणणे व त्यांचे शुल्क एकसमान करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे, त्यासाठी स्टॅम्प ऍक्‍टमध्ये दुरुस्ती करून या दोन्ही मॉर्गेजवर 0.3 टक्के मुद्रांक शुल्कच आकारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. 

खरंच यांना सलाम करायला हवा! कोरोना 'हॉटस्पॉट'मधून हजारो गणेश...

गेल्या वर्षी झालेले इक्विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेजची संख्या व त्यातून मिळालेले उत्पन्न पुढील प्रमाणे - 
- इक्विटेबल मॉर्गेजची 2 लाख 88 हजार 
-मिळालेले उत्पन्न 383 कोटी रुपये (0.2 टक्‍क्‍यांनी मिळालेले मुद्रांक शुल्क) 
सिंपल मॉर्गेजची 3 लाख 65 हजार 
- मिळालेले उत्पन्न 1 हजार 807 कोटी रुपये (0.5 टक्‍क्‍यांनी मिळालेले मुद्रांक शुल्क) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST 2.0 : नवी गाडी घेताय? जरा थांबा! सेकंडहँड गाड्याही स्वस्त, 'ही' कंपनी देत आहे २ लाखांपर्यंत सूट...

IPhone 17 Crowd: आयफोन १७ विक्री सुरू; बीकेसीच्या स्टोअरबाहेर तुफान गर्दी, रांगेत धक्काबुक्की अन् हाणामारीचा थरार!

RBI Recruitment 2025: रिझर्व बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ग्रेड-बी ऑफिसर पदासाठी १२० जागांची भरती सुरू; जाणून घ्या पगार आणि अर्ज प्रक्रिया

Latest Marathi News Updates : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

Latur News: प्रसूतीसाठी दाखल झालेल्या माता अन् बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT