Corona_Patient 
पुणे

Corona Updates: पुणे जिल्ह्यात कोरोनाला ओहोटी; मृत्युदर आला निम्म्यावर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच्या महिनाभरातील नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत दिवाळीनंतरच्या महिन्यात नवे रुग्ण कमी झाले आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत मात्र हेच प्रमाण याऊलट आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवाळीनंतरच्या महिन्यात सुमारे 50 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. दरमहा मृत्यू निम्म्यावर आले आहेत. पुणे शहरातील दरमहा रुग्णसंख्येत मात्र अल्प वाढ झाली आहे. शहरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 68.34 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे.

दिवाळीपुर्वीच्या महिन्यात म्हणजेच 12 ऑक्‍टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात 22 हजार 460 नवे कोरोना रुग्ण सापडले होते.
दिवाळीनंतरच्या महिन्यात म्हणजेच 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत
21 हजार 472 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यावरून दिवाळीपुर्वीच्या
महिन्याच्या तुलनेत दिवाळीनंतरच्या महिन्यात नवे कोरोना रुग्ण 988 नी कमी
झाले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या
रुग्णांच्या आकडेवारी अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.

मागील महिन्यात (12 ऑक्‍टोबर ते 12 नोव्हेंबर) 41 हजार 38 जण कोरोनामुक्त झाले होते. चालू महिन्यात 1(2 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर) 21 हजार 69 जण कोरोनामुक्त झाले आहेत. या दोन्ही महिन्यांतील कोरोनामुक्त रुग्णांची तुलना केल्यास, चालू महिन्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण जवळजवळ निम्म्याने कमी झाले आहे.

जिल्ह्यात दिवाळीआधीच्या महिन्यात 937 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिवाळीनंतरच्या महिन्यात हीच संख्या 471 झाली आहे. म्हणजे दरमहा मृत्यूचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत सुमारे निम्म्याने कमी झाले आहे. पुणे शहरात मागील महिन्यात 9 हजार 534 नवे रुग्ण आढळून आले होते.

हीच संख्या चालू महिन्यात 9 हजार 604 वर गेली आहे. यावरून मागील
महिन्याच्या तुलनेत शहरात केवळ 70 नवे रुग्ण वाढले आहेत. शहरात गेल्या
महिन्यात 540 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या महिन्यात 171 जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची तुलनात्मक स्थिती

- मागील महिन्यातील नवे रुग्ण - 22 हजार 460.
- चालू महिन्यातील नवे रुग्ण - 21 हजार 472.
- दरमहा रुग्णांतील फरक - 988 कमी.
- मागील महिन्यातील कोरोनामुक्त - 41 हजार 38.
- या महिन्यातील कोरोनामुक्त - 21 हजार 69.
- मागील महिन्यातील एकूण मृत्यू - 937.
- या महिन्यातील एकूण मृत्यू - 471.
- दरमहा मृत्यूच्या संख्येत घट - 466.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT