corona-g.jpg 
पुणे

आंबेगावमधील ती मुलगी...पोलिस, वकील, लिपिक अन्...

डी.के. वळसे-पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यात आज (ता. ५) पारगाव-शिंगवे व एकलहरे येथील एकूण दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकूण पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ६२ झाली आहे. त्यापैकी बरे झालेल्या ४८ जणांना घरी सोडले आहे. दोन जणांचा मृत्यू झाला असून ४ जण पुणे येथे व ८ जणांवर भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ४२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकात चिंता वाढली आहे. प्रशासनाने तालुक्यातील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करावे अशी मागणी आंबेगाव तालुका पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले यांनी केली आहे.

एकलहरेच्या अल्पवयीन पिडीत मुलीचे जबाब मंचर पोलिस ठाण्यात व त्यानंतर घोडेगाव न्यायालयात घेण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करताना तिच्यात लक्षणे दिसून आली. त्यामुळे तिला ससूनला पाठविण्यात आले. ती पॉझिटिव्ह आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. तिच्या संपर्कात आलेले मंचर पोलिस ठाण्यातील ६ पोलिस कर्मचारी, मंचर उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर व घोडेगाव न्यायालयातील वकील, लिपिक, शिपाई यांच्यासह चार कर्मचारी अशा एकूण १२ जणांना होम क्वरंटाईन केले आहे. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले जाणार आहे. या घटनेमुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी, न्यायालयात वावर असलेले वकील व कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे म्हणाले, ''सदर मुलगी पूर्वी लोंढेमळा-एकलहरे येथे राहत होती. पण एक महिन्यापासून तिचे वास्तव्य शिरूरला आहे. शिरूर येथेही तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. याबाबत शिरूरच्या तालुका अधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली आहे.'' आंबेगाव तालुक्यात कोरो ना पॉझिटिवसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : शिवरायांची शपथ घेऊन सांगितलेले, मराठ्यांना आरक्षण देणारच; एकनाथ शिंदेंनी केली 'त्या' घोषणेची आठवण

CM Fadnavis reaction: ‘’मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी...’’ ; जरांगेंनी उपोषण थांबवलं अन् फडणवीसांनी केलं मोठं विधान!

Maratha Reservation : मराठा समाजास आरक्षण मिळाल्यानंतर तुळजाभवानी मातेची आरती, तुळजापूरात आनंदोत्सव

Pune Crime : आंबेगावमध्ये आंदेकर टोळीचा खुनाचा कट उधळला; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

Latest Marathi News Updates: मनोज जरांगेंच्या कुटुंबियांनी साजरा केला आनंद

SCROLL FOR NEXT