पुणे

दिवाळीनंतर आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित वाढले

डी. के. वळसे पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यात दिवाळीनंतर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. पूर्वी तीन किंवा चारपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत नव्हते. पण शुक्रवारी (ता. २०) रोजी १०  कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आंबेगाव तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याची चर्चा नागरिकांप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रात सुरु आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंचर पाच, नारोडी , खडकी, पारगाव , वडगाव काशिंबेग येथे प्रत्येकी एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. एकूण रुग्णसंख्या चार हजार १३४ झाली असून, तीन हजार ९१५ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ११०  रुग्णांचा मृत्यू झाला असून, १०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.

सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे. मास्क न वापरता फिरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. दुकानदाराकडूनही सँनिटायझरचा वापर केला जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाने  तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात. -संजय गवारी, सभापती आंबेगाव तालुका पंचायत समिती 

मंचर कोविड उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (ता. २०) रोजी ४४ संशयितांची कोविड चाचणी घेतली. त्यामध्ये पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एकूण ३२ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. -डॉ. अंबादास देवमाने, वैद्यकीय अधीक्षक 

अवसरी खुर्द शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात कोविड उपचार केंद्रात रविवार (ता. १५) ते गुरुवार (ता. १९) पर्यंत ६५ संशयितांपैकी सात रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, असे डॉ. सीमा देशमुख यांनी सांगितले. दिवाळीनंतर मंचर शहरात एकूण २२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. -डॉ. सुरेश देशमुख, आरोग्य अधिकारी, आंबेगाव तालुका

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: निळवंडे कालव्याचं काम मोदींमुळे पूर्ण झालं - देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT