Corona-Seal-Pune 
पुणे

Lockdown : दापोडी, कासारवाडी सील; पिंपरीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहचला...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना संसर्ग झालेल्या शहरातील रुग्णांमध्ये तिघांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 29 झाली आहे. दरम्यान, दापोडी आणि कासारवाडी भाग शनिवार (ता.११) रात्री अकरापासून सील करण्यात आला. 

शहरातील पाॅझिटीव्ह व्यक्तींची संख्या गेल्या पाच-सहा दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठ दिवसांत 14 जण वाढले असून पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 29 झाली आहे. त्यातील 12 जण बरे होऊन घरी पोचले आहेत. उर्वरित 14 जणांवर वायसीएममध्ये, तर काल आढळलेल्या तिघांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात एका परिचारिकेचा समावेश आहे. त्या पुण्यातील रुग्णालयात कार्यरत असताना त्रास होऊ लागला. त्यांचा अहवाल शनिवारी पाॅझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे. 

30 दिवसात 29

कोरोना संसर्ग झालेले पहिले तीन रुग्ण 11 मार्चला वायसीएममध्ये दाखल झाले होते. त्यांचे एनआयव्हीकडील अहवाल 12 मार्चला पाॅझिटीव्ह आले होते. या घटनेला शनिवारी 30 दिवस पूर्ण झालेत आणि पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 29 झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. चिखली घरकुल, खराळवाडी, थेरगाव, पडवळनगर, दिघी, भोसरी पाठोपाठ दापोडी आणि कासारवाडी भागही शनिवार रात्रीपासून सील केले. 

दापोडी, कासारवाडीतील हा भाग करणार सील

दापोडीतील माता शितळादेवी चौक, विनियार्ड चर्च, सुखवानी ग्लोरी, पब्लिक फूड शेल्टर, धुम स्टार मेन्स पार्लर, पिंपळे गुरव रस्ता. कासारवाडीतील सिद्धार्थ मोटार, दत्त मंदिर, पिंपळे भारत गॅस, लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) सीमा भिंती लगतचा भाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईचा विकास रखडला? बीएमसी बजेटपैकी ४८% निधी अजूनही प्रलंबित, खर्चाचे आकडे समोर

Viral Video: धक्कादायक! आईनं १०व्या मजल्याच्या बाल्कनीतून मुलाला लटकवलं; वेगळंच कारण समोर, पाहा व्हायरल व्हिडिओ

Mumbai: रस्ते आणि पुलांना नवी ओळख मिळणार! मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची नावे बदलणार; पण कोणत्या? जाणून घ्या यादी...

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

Dhule News : दोंडाईचा पोलिसांची मोठी कामगिरी! वर्णेश्वर महादेव मंदिरातील चोरीचा २४ तासांत छडा

SCROLL FOR NEXT