corona_checkup 
पुणे

Coronavirus : पुणेकरांनो इकडे लक्ष द्या; कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 896 झाली असून,135 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात कोरोना बाधित 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 12 रुग्ण गंभीर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात 813 बाधित रुग्ण असून, 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 16 रुग्ण असून, 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 30 रुग्ण असून, 3 रुग्णांचा, तर सांगली जिल्ह्यात 27 बाधित रुग्ण असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 10 बाधित रुग्ण आहेत, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

1 डॉक्टर आणि 2 नर्सना कोरोनाची लागण

उरुळी कांचन येथील कोरोना बाधित महिलेवर लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना, संपर्कात आलेल्या ५१ पैकी एक डॉक्टर व दोन नर्स असे तीन जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.

५१ पैकी ४८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल बुधवारी (ता. २२) सायंकाळपर्यंत रुग्णालयाला मिळाले आहेत. ४८ पैकी पंचेचाळीस जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. तीन जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड

सार्वजनिक ठिकाणी वावरताना अनेक नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. अशा व्यक्तींवर कारवाई करीत 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी काढला.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आजपर्यंत शहरातील 65 जणांना लागण झाली आहे. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. आठ एप्रिलच्या आदेशानुसार नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक आहे.

दरम्यान, तरीही रुग्णालये, बाजारपेठ, शासकीय कार्यालयांसह इतर सर्व परिसरात वावरताना शहरातील अनेक नागरिक मास्क परिधान करीत नाहीत. त्यामुळे दंड आकारणीचा अधिकार आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक, सहाय्यक आरोग्य अधिकारी यांना देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT