saswad
saswad 
पुणे

पुरंदरमधील कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिलेत हे आदेश

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील वाढती कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण संख्या पाहता येथे कोविड केअर सेंटरची संख्या व क्षमता त्वरित वाढवावी, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज स्थानिक प्रशासनास दिले. तसेच,  कोविड हाॅस्पीटलची व्यवस्था करू, असे सांगितले. 

पुरंदर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राम यांनी तालुक्याला भेट देऊन आढावा घेतला. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदिप पाटील, प्रांत प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनौबत, सासवड पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक, जेजुरीच्या पूनम शिंदे- कदम, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, राहुल घुगे, राजेश माने, डाॅ. किरण राऊत आदी उपस्थित होते. 

या वेळी, जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कोविड हाॅस्पीटल उभारणीत पुरंदरला मागे आहे, या पत्रकारांच्या मुद्द्यावर..ती पण व्यवस्था करु, असे जिल्हाधिकारी राम म्हणाले. त्यावरून मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचे आदेश त्यांनी स्थानिक प्रशासनास दिले. तसेच, विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी आवश्यक ते सर्व काही करा; असेही त्यांनी बजावले. 

पुरंदर तालुक्यातील रुग्ण संख्या अडीचशेपर्यंत जात असताना पुण्यात या पुढे रुग्ण जाणे बंद होईल. स्थानिक पातळीवर व्यवस्थित सोय हवी, असा मुद्दा पत्रकारांनी मांडला. पुणे कनेक्शनमधून ये- जा करणारे खुप आहेत. त्यांनी आल्यावर होम क्वारंटाइन राहणे अपेक्षित आहे. अन्यथा संसर्ग वाढेल. कन्टेन्मेंट झोनमधील लोकांनी शिस्त पाळली पाहिजे. पोलिस यंत्रणेने त्याकडे पहावे, असे जिल्हाधिकारी राम व जिल्हा पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांनी स्पष्ट केले. 

पुरंदरमधील स्थानिक पातळीवर रुग्णालयात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची उपचार व्यवस्था वाढविणे, स्वॅब तपासणी स्थानिक पातळीवर वाढविणे, क्वारंटाइन प्रकारावर भर देणे, मास्क न वापरणाऱ्यावर व शिस्त न पाळल्यास कारवाई करणे, आदी बाबीवर भर देण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्थानिक प्रशासनास दिले.

Edited by : Nilesh Shende
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT