Corona_Positive 
पुणे

Corona Updates: पुणे जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या होऊ लागली कमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात पुन्हा सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात अकरा हजारांचा आकडा ओलांडलेली सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी (ता.7) पुन्हा साडेदहा हजारांवर आली आहे. जिल्ह्यात सोमवारी (ता.7) 480 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांत पुणे शहरातील 480 जण आहेत.

गेल्या 24 तासांत 660 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून अन्य 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 6 हजार 299 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. पुणे शहरातील सर्वाधिक 202 रुग्णांबरोबरच चिंचवडमध्ये 137, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 99, नगरपालिका कार्यक्षेत्रात 38 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 4 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील नऊ, िंपंपरी चिंचवडमधील चार आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील तीन जणांचा समावेश आहे. नगरपालिका आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 208 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 6 हजार 598 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 8 हजार 508 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 412 रुग्ण आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही रविवारी (ता.6) रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी (ता.7) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील 336 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 90, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 146, नगरपालिका कार्यक्षेत्रातील 74 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील 14 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT