The number of teachers to be called in schools require concrete planning 
पुणे

शाळांमध्ये किती प्रमाणात शिक्षक बोलवायचे, याचेही होणार नियोजन

सकाळवृत्तसेवा

पुणे : शाळा सुरु करताना शिक्षकांना किती प्रमाणात बोलवावे, याचे नियोजन करण्यात यावे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी राज्यव्यापी मोहीम राबवावी. संच मान्यतेसाठी आधारकार्डची सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

त्याचप्रमाणे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी राज्यव्यापी मोहीम राबवावी. तसेच कोरोनामुळे अनेकांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे शाळांची पटसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. म्हणूनच सरकारने शाळांना पटसंख्या वाढविण्यासाठी तीन वर्षांची सवलत द्यावी. जेणेकरून कोणतेही शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत. शाळेची पटसंख्या लक्षात घेऊन क्रमिक पुस्तकांचे वाटप करण्यात यावे.

- पुणे : १५ जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार? महापालिका आयुक्त म्हणतात...!

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे नियोजन करताना किती प्रमाणात शिक्षकांना बोलविण्यात यावे, याचे नियोजन करावे, असे शिक्षक सेनेचे समन्वयक सुनील जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.

पुण्यातील मार्केट यार्डाबाबत महत्वाचे अपडेट; वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT