Corona-Vaccination
Corona-Vaccination 
पुणे

पुण्यात लसीकरण केंद्रांची संख्या जाणार १०० च्या पुढे

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना प्रतिबंधक लसिकरणासाठी ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी नागरिकांची गर्दी वाढत असल्याने आता शहरातील लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. सध्या शहरात ४२ शासकीय तर २७ खासगी रुग्णालयात लसीकरण केले जात आहे. पुढील तीन चार दिवसात ही संख्या १०० च्यापुढे जाणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात महापालिका, पोलिस यासह इतर शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना लसीकरण करण्यात आले. १ मार्च पासून तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक व ४५ वयापेक्षा जास्त पण सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. एक मार्च रोजी पुण्यात केवळ चार ठिकाणी लसीकरण केले जात होते, तेथे ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने ही यंत्रणा कोलमडून पडली. त्यामुळे पुणे महापालिकेने लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. ५ मार्च रोजी शहरात ६२ लसीकरण केंद्र होते. यामध्ये वाढ करून आता ही संख्या ६९ वर गेली आहे. यामध्ये ससून व महापालिका मिळून ४२ केंद्र आहेत. तर खासगी दवाखान्यात २७ ठिकाणी लसीकरण केले जात आहे. शासकीय केंद्रांवर मोफत लसीकरण केले जात आहे, तर खासगी रुग्णालयात २५० रुपये शुल्क घेतले जात आहे.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल म्हणाल्या, ‘‘सध्या ६९ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहरात आणखी ४७ खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात त्यास मान्यता मिळेल. जम्बो हॉस्पिटलमध्ये १० ठिकाणी लसीकरणाची सोय केली जाईल. त्यामुळे १२० पेक्षा जास्त ठिकाणी लसीकरण केल जाईल. तसेच इतर शासकीय रुग्णालयात लसीकरणाची सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

एका दिवसात ९ हजारापेक्षा जास्त लसीकरण
शनिवारी (ता. ६) एका दिवसात ९ हजार १८५ जणांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये ६ हजार २६२ ज्येष्ठ नागरिक आहेत. तर ९७४ सहव्याधी व्यक्ती आहेत. त्याच प्रमाणे ९३३ आरोग्य सेवकांनी, तर १ हजार १६ फ्रंट लाइन वर्करचे लसीकरण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत शहरात एकूण ७९ हजार ७ जणांनी लस घेतली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT