Manja Sakal
पुणे

पुणे : मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

19 रिळ मांजा व व 49 हजार रुपये जप्त, मांजा विक्रेत्यांवर आणखी कडक कारवाई होणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नागरीकांच्या व पक्षांच्या जीवीतास धोका निर्माण करणारा व कायद्याने विक्री करणे बंद असतानाही प्लॅस्टिक, नायलॉन, सिंथेटिक सारखा घातक मांजा (Nylon Manja) विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या (Pune Police Arrest Criminals). पोलिसांनी त्यांच्याकडून 19 रिळ व 50 हजार रुपये किंमतीचा मांजा जप्त केला. (Pune Illegal Business)

जुनेद अकबर कोल्हापुरवाला (वय 29, रा. गणेश पेठ), अदनान असिफअली सय्यद (वय 19, रा. गणेश पेठ) असे अटक केलेल्या विक्रेत्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षक कायदा 1986 च्या कलम 5, 15 नुसार फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकरसंक्रातीच्या पार्श्‍वभुमीवर शहरात बंदी असलेल्या चिनी, नायलॉन, सिंथेटिक अशा प्रकारातील मांजाची सर्रासपणे विक्री होते.

"सकाळ'च्या कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांच्यासह पिंपरी-चिंचवड येथील डॉ.कृपाली निकम या तरुणींना मांजामुळे जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दरवर्षी मकरसंक्रातीच्या पार्श्‍वभुमीवर पतंग उडविण्यासाठी विक्रेत्यांकडून घातक मांजाची सर्रासपणे विक्री केली जात आहे.

शुक्रवारी (ता. 14) संक्रातीनिमित्त पतंग उडविण्यासाठी मांजाचा वापर होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभुमीवर मांजामुळे नागरीकांच्या जीवीतास धोका निर्माण झाल्याबाबतचे वृत्त "सकाळ'ने सोमवारी प्रसिद्ध केले होते.

त्याची पुणे पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन कारवाईला सुरुवात केली. गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाकडून, घातक मांजा विक्री करणाऱ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू होते. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्यास रविवार पेठेतील बोहरी आळी येथील एक दुकानदार चोरुन नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने तेथे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर संबंधित दुकानांमध्ये छापा टाकला.

त्यावेळी दुकानातुन नायलॉन मांजाचे 19 रिळ (बंडल) व 50 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. कोल्हापुरवाला व सय्यद या दोघांनाही अटक करुन फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हि कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट एक कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, महिला पोलिस कर्मचारी मीना पिंजण, रुखसाना नदाफ, पोलिस कर्मचारी अजय जाधव, अजय थोरात, अशोक माने, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

...तर विक्रेत्यांवर होणार कडक कारवाई !

प्लॅस्टिक, नायलॉन, सिंथेटीक मांजाच्या वापराने पक्षी व मनुष्यास गंभीर स्वरुपाच्या इजा, दुखापती होतात. त्यामुळे विक्रेत्यांनी अशा प्रकारच्या बंदी असलेल्या घातक मांजाची विक्री करु नये किंवा जवळ बाळगू नये, अन्यथा संबंधित विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच नागरीकांनीही अशा विक्रेत्यांबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT