marriage.jpg 
पुणे

...म्हणून आळंदीत मंगल कार्यालयवाले झिजवतायत गाव कारभाऱ्यांचे उंबरे....

विलास काटे

आळंदी (पुणे) : मंगल कार्यालयवाल्यांनी चोरून लग्नासाठी आधी पोलिसांबरोबर केलेल्या तोडपाण्याची रंगलेली चर्चा विरून जात नाही तोच आता लग्नाला अधिकृत परवानगी मिळावी यासाठी ग्रामस्थांपैकी काही कार्यालय मालक गाव कारभा-यांची मनधरणी करू लागले. गेली दोन दिवस मंगल कार्यालयवाले त्या सन्माननिय कारभा-यांचे उंबरे झिजवत असल्याचे चित्र आहे. आळंदी आणि परिसरातील च-होली, वडमुखवाडी, चाकण, मोशी, डुडुळगाव या गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. आळंदीतही नुकतेच कोरोनाची लागण झालेली महिला मृत झाली. आणि त्यांच्याच नातेवाईकांपैकी आणखी एका मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. प्रस्थानच्या आधीच अहवाल आल्याने पोलिस आणि पालिका प्रशासनाने कडक धोरण अवलंबले आणि  मंदिराकडे जाणा-या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून रस्ते सील केले.

प्रांताधिकारी संजय तेली यांनी आदेशान्वये बाहेरून येणा-या व-हाडींच्या लग्नांना बंदी केली. तरीही काहींनी प्रशासनाला न जुमानता लग्ने लावली. पोलिसांनी तीन आठवड्यापूर्वी चोरून लग्न लावणा-या एका कार्यालय मालकांवर गुन्हाही दाखल केला होता. चोरून लग्ने लावली तर पैसे कमी मिळतात. जेवणासह मोठी लग्ने आली तर पैसे जास्त मिळतात. मात्र, संचारबंदी लागू झाल्यापासून मंगल कार्यालयवाल्यांवर दिवस वाईट आले. ऐन लग्न सराईत आर्थिक नुकसान झाले. मात्र, समाजहितही दुर्लक्षून चालणारे नव्हते. तरीही काहींनी समाजहित बाजूला ठेवून लग्नाचा बाजार मांडू लागले. चोरून शहरात लग्ने होत गेली. त्यात काही पोलसांनी पैसे घेवून साथ दिली. लग्नासाठी झालेल्या पोलिसांच्या तोडपाण्याची चर्चा आळंदी आणि परिसरात चांगलीच रंगली होती. ही चर्चा विरून जाण्याच्या आतच आता मंगल कार्यालयवाले आता लग्न लावण्याची परवानगी मिळण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांपैकी ज्या पुढा-यांची चलती आहे. त्यांचे उंबरे झिजवू लागले आहेत.

लग्न लावण्यासाठी एकेकाच्या घरी जावून कार्यालयवाले मिन्नतवारी करू लागले. गावकारभा-यांनाही हेच पाहिजे होते. त्यांनी पाठिंबा देण्यासाठी आपल्याच मर्जीतील लोकांच्या सह्या गोळा करण्यास गेली दोन दिवसांपासून सुरूवात केली. अन् काल दुपारी खेड प्रांताधिकारी संजय तेली यांची भेटही घेतली. वास्तविक आळंदी पन्नासहून अधिक लोक व्यावसायिक पद्धतीने लग्न लावत आहेत. धर्मशाळा आणि घरामधूनही लग्न लावणा-यांची संख्या लक्षणिय आहे. मुख्याधिकारी समिर भूमकर यांनी सांगितल्यानुसार चारशेहून अधिक ठिकाणी ऐन हंगामात लग्ने लागतात. एका कार्यालयात पन्नास व-हाडी बाहेरून आले तरी किमान दोन ते अ डिच हजार व-हाडी रोज आळंदीत येजा करतील. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पुणे पिंपरीबरोबरच राज्याच्या इतर भागातून आळंदीत येणा-या व-हाडींना मज्जाव केला नाही तर आळंदीतील परिस्थिती हाताबाहेर जाईल. हा विचार करूनच आळंदीत लग्नांना बंदी आहे. मात्र, स्थानिक आळंदीकर मुलामुलींना यातून सूट आहे.

नुकतेच झालेल्या प्रस्थानसाठी  वारक-यांना आळंदीत प्रवेश देण्यास ठाम नकार देणारे प्रशासन आता लग्नांचा बाजार मांडणा-या मुठभर लोकांच्या मागणीबाबत काय भूमिका काय देतात याकडे आळंदीकरांचे लक्ष लागले. कारण सर्वसामान्य आळंदीकर संपूर्ण लॉकडाऊनमधे स्वत:ला घरात कोंडून घेतले. आणि आता कोरोनाचे रूग्ण आढळत असताना प्रशासनाने शब्दच्छल करून आदेशात फेरबदल करून लग्नांना परवानगी दिली तर एवढे दिवस आम्ही घरात राहन चूक केली का असा सवाल आळंदीकर आणि वारकरी विचारत आहेत. आता लक्ष लागले ते प्रांताधिका-यांच्या नव्या आदेशाकडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT