Old people Sakal
पुणे

जवळ दमडीही नाही, जगायचं कसं?

विविध कंपन्या, बॅंका, पतसंस्थांमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या अशा हजारो वृद्ध नागरिकांना ‘आता जगायचे कसे?’ हा प्रश्‍न पडला आहे.

पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे - उतारवयात आर्थिक (Economic) चणचण भासू नये, यासाठी जादा व्याजदराच्या (Interest) लोभापोटी बांधकाम व्यावसायिकाच्या योजनेत (Construction Business Scheme) दहा लाख रुपये गुंतवले. (Investment) सुरुवातीला चांगले व्याज मिळाले. त्यानंतर पैसे (Money) येणे बंद झाले. माझ्यासारख्या शेकडो जणांची फसवणूक (Cheating) झाली. आता गुंतवलेले पैसे नाहीत आणि जवळ दमडीही नाही. आजारपण, औषधोपचार, कुटुंबाचा खर्च भागवायचा कसा, हा प्रश्‍न आहे मांजरी रस्ता येथे राहणाऱ्या ७० वर्षीय तुळशीराम राऊत यांचा. (Old People Investment Cheating Life Crime)

विविध कंपन्या, बॅंका, पतसंस्थांमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या अशा हजारो वृद्ध नागरिकांना ‘आता जगायचे कसे?’ हा प्रश्‍न पडला आहे. आयुष्यभर कमावलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवून त्याच्या व्याजातून उरलेले आयुष्य जगायचे, अशा उद्देशाने अनेक जण बांधकाम कंपन्या, वित्तीय संस्था, पतसंस्था, बॅंकांना प्राधान्य देतात. जादा व्याजदर, जमीन, प्लॉटचे आमिष दाखवून अनेक ज्येष्ठांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यामुळे बहुतांश सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिकांनी तेथे गुंतवणुक केली. मात्र काही दिवसांतच संबंधित कंपन्यांनी त्यांची फसवणूक केली. त्यामध्ये हजारो ज्येष्ठ नागरिकांचे लाखो रुपये अडकून पडले. बहुतांश प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

प्रत्यक्षात नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा कोणताही मार्ग अद्याप निघालेला नाही. बॅंकांमधून पैसे काढण्यावर मर्यादा आली. बहुतांश कंपन्या, बॅंका, पतसंस्थांची प्रकरणे चार-पाच वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहेत.

फसवणूक करणाऱ्या कंपन्या

डीएसके, भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर), शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक, फडणीस ग्रुप ऑफ कंपनी, टेम्पल रोझ, सिट्रस चेक इन्स क्‍लब, कल्याणी नागरी पतसंस्था, रावत भिशी, संस्कार ग्रुप यांसारख्या अनेक कंपन्या, पतसंस्था, बॅंका व वित्तीय संस्थांकडून हजारो नागरिकांची फसवणूक झाली आहे.

कंपन्या व ठेवीदारांची संख्या

  • डीएसके - ३३,०००

  • फडणीस ग्रुप ऑफ कंपनी - ३४२

मला हृदयाचा त्रास असून, दोनदा शस्त्रक्रिया झाली आहे. डीएसकेकडे २०१५ मध्ये मी दहा लाख रुपये गुंतवले होते. फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. चार-पाच वर्ष उलटूनही अडकलेले पैसे मिळाले नाहीत. महागाई वाढली आहे. त्यात जवळ पैसे नसल्याने कसे जगावे, हा प्रश्‍न आहे. न्यायालयाने योग्य मार्ग काढून आमचा प्रश्‍न सोडवावा.

- तुळशीराम राऊत, ठेवीदार

आईने व मी डीएसके व फडणीस ग्रुपमध्ये आठ लाख रुपये गुंतविले होते. त्यांनी ठेवीदारांची फसवणूक केल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. तीन वर्ष उलटूनही निर्णय लागला नाही. आम्ही मुख्यमंत्री, पंतप्रधानांशीही पत्रव्यवहार करून थकलो. कोरोनाच्या काळात आमचे जगणे मुश्‍कील झाले आहे. आम्हाला न्याय जीव गेल्यावर मिळणार का?

-प्रज्ञा कुलकर्णी, ठेवीदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT