ve.jpgve.jpg 
पुणे

आता मला कोणाचाही आधार नाही...असे म्हणतच त्यांचे डोळे पाणावले... 

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट : कोणी न्याय देता का न्याय... अशी आर्त हाक एक निराधार महिला देत आहेत. वारंवार पालिका आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहे. न्यायालय आणि पालिका अधिकाऱ्यांनी सांगूनही निबरगट्ट बिल्डरने निराधार महिलेला घर देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. तरीसुद्धा शुक्रवार पेठेतील वयोवृद्ध महिला न्याय मिळेल या आशेने त्यांनी पंतप्रधान ते राज्यांचे मुख्यमंत्री यांच्याकडे हि साकडे घातले आहे.

तसेच आता तरी शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून शुक्रवार पेठेतील यशोदाबाई चांदड या महिलेला न्याय देतील  का ? अशी आशा टिपून ती महिला गेल्या अनेक वर्षापासून एका खोलीसाठी झुंज देत आहे. शहरातील वाड्यांच्या ठिकाणी उंच इमले उभे राहत आहेत. मात्र, त्या ठिकाणी राहणाऱ्या निराधारांना पालिका अधिकारी आणि न्यायालयाकडूनही दाद मिळत नाही, अशी अवस्था 563, शुक्रवार पेठेतील राहणाऱ्या यशोदाबाई चांदड (वय 52वर्षे ) यांची झाली आहे. चांडक यांनी वेळोवेळी पालिकेकडे दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाचेही दरवाजे ठोठावले आहेत. अद्यापही त्या न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

शुक्रवार पेठेमध्ये यशोदाबाई चांडक या आई-वडिलांबरोबर जन्मापासून त्या वाड्यात राहत आहे. आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्या निराधार झाल्या. येथे बिल्डरने वाडा खरेदी करून तेथे इमारत उभी केली. मात्र, बिल्डरने चांडक यांचे राहते घर जागेवर ठेवले. सध्या हे घरातील दोन्ही भिंती ढसाळलेल्या आहेत. ताडपत्री, बॅनर, लाकडांचा आधारावर हे घर उभे आहेत. त्यात उन्हा पावसाचा मोठा त्रास त्यांना सहन करावा लागतोय.

दरम्यान, चांडक यांनी पालिका आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पालिकेने बिल्डरला त्यांच्यासाठी घर देण्याचे आदेश दिले. न्यायालयानेही बांधकामावर स्टे दिला होता. तरीही बिल्डरने बांधकाम पूर्ण केले. चांडक यांना बिल्डरने या इमारतीमध्ये खोली दिली. मात्र, ती खोली राहण्यायोग्य नसल्याने चांदड यांनी तेथे राहण्यास नकार दिला. त्या खोलीचा वापर बाहेरील लोक मद्यपान व जुगार खेळण्यासाठी करतात. याविषयीच्या अनेक तक्रारी पोलिस दफतरी  नोंद आहेत.

तसेच खोली समोरच ड्रेनेज लाईन चे चेंबर असल्याने सतत दुर्गंधी व घाणीचा त्रासाबरोबर असुरक्षितता हि महिलेला सहन करावा लागतेय. त्यांना कोणाचाही आधार नाही, त्यांचे वय झाले आहे, त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यांच्या असह्यतेचा बांधकाम व्यावसायिकाने फायदा घेत असून, चांडक यांना वाऱ्यावर सोडले आहे.

चांडक म्हणाल्या, ''शुक्रवार पेठेतील वाड्यामध्ये माझे घर होते. बिल्डरे 1997-2000 साली इमारतीचे काम पूर्ण केले. यावेळी असुविधेबाबत कामाला हरकत घेऊन पालिकेकडे तक्रार केली. त्यावेळी पालिकेच्या बांधकाम विभागाने हे काम थांबविण्यास सांगितले होते. मात्र, बिल्डरने बांधकाम न थांबविता इमारत बांधून पूर्ण केली. आता मला कोणाचाही आधार नाही, कोणी न्याय देईल का न्याय अशी आर्त हाक यशोदाबाई चांडक देत आहेत. मात्र, त्यांचा आवाज पालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यांचा आवाज आणखी क्षीण होत चालला आहे.

या संबंधित बांधकाम व्यावसायिक उमेश अंबार्डेकर हे म्हणाले की,  या महीलेच्या राहत्या खोलीमुळे माझ्या दुकानाला अडचण निर्माण झाली आहे. त्यांच्या राहत्या घराच्या जागेएवढीच एक  खोली इमारतीत  तयार केलेली आहे. त्यांनी त्याठिकाणी राहण्यास जावे. मात्र आहे त्याच जगेवार मी नवीन खोलीचे बांधकाम करणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

SCROLL FOR NEXT