One arrested in Loni Kalbhor for harassment by misusing FB Whatsapp 
पुणे

तोंडओळखीवर शिक्षिकेला जेजुरीला नेऊन फसवणूक करणाऱ्या भामटयास अटक

जनार्दन दांडगे., सकाळवृत्तसेवा

लोणी काळभोर (पुणे) :  तोंडओळखी असलेल्या सोलापूरच्या शिक्षेकेला जेजुरीला फिरायला जाण्याच्या बहाण्याने दागिने आणि पैसे घेऊन पसार झालेल्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. योगेश पाटील उर्फ गणेश शिवाजी कारंडे (वय ३६, रा.जगदीश नगर, श्रीपुर, ता.माळशिरस, जि.सोलापुर) असे आहे. लोणी काळभोर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. गणेश कारंडे आर्थिक दृष्ट्या सधन असलेल्या महिलांसोबत फेसबूक, हॉटस्अपवर ओळख वाढवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. तसेच  संबधित महिलांचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम लंपास करत होता.

हेही वाचा - सतत प्रियकराशी बोलते या संशयातून पतीने केला खून...

गणेश कारंडे याने २६ जानेवारीला सासवड-हडपसर रस्त्यावर वडकी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका महिला शिक्षेकेला रस्त्यावर सोडुन दिले होते.  तिच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम व मोबाईल फोन असा ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. या प्रकरणात आरोपीची ओळख पटेल असा कसलाही पुरावा नसतानाही, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणेश कारंडे या लंफग्याला करमाळा परिसरातून अटक केली आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कारंडे हा श्रीपुर परिसरात रहिवाशी असून आहे. आर्थिक दृष्ट्या सधन असलेल्या विविध महिलांच्या बरोबर फेसबुक, हॉटस्अप सारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख वाढवित होता. दरम्यान वर्षभरापूर्वी सदर महिला या शैक्षणिक कामानिमित्त करमाळा येथे आल्या असता, त्यांची  गणेशसोबत ओळख झाली. यावेळी गणेश याने त्याचे नाव योगेश पाटील असे सांगितले. नकळत सदर महिला यांच्याकडून त्यांचा मोबाईल नंबर मागून घेतला. त्यानंतर वर्षभराच्या काळात गणेश याने सदर महिला यांच्याशी हॉटस्अपच्या माध्यमातून संपर्क ठेवला होता. 

हेही वाचा - अ.. अ.. अननस खूपच फायदेशीर! आरोग्यासाठी कमालीचे लाभदायक फळ

दरम्यान सदर महिला २६ जानेवारीला पुण्यात खाजगी कामानिमित्त आल्याची माहिती मिळताच, गणेश कांरडे याने यांना जेजुरी परिसरात फिरण्यास येणार का अशी विचारणा केली. त्यावर सदर महिला यांनी जेजुरी परीसरात फिरण्यासाठी जाण्यास होकार दिला. दोघेही हे दोघेजण गणेशच्या चारचाकी वाहनातून जेजुरी परिसरात फिरण्यास गेले. जेजुरी परिसरात दोन ते तीन तास फिरल्यानंतर, पुण्याकडे परताना सदर महिलेला सासवड- हडपसर रस्त्यावर वडकी ग्रामपंचायतीच्या हद्दीत, घाटाच्या खाली उतरवले. सदर महिलेला चारचाकीतून खाली उतरवताच यांच्याजवळील ३५ हजार रुपये रोख, २० हजार रूपये किमतीची पुष्कराज खडा असलेली अर्धा तोळा वजनाची एक सोन्याची अंगठी व २० हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा रेनो ३ मॉडेलचा मोबाईल घेऊन गणेश फरार झाला होता. ही तक्रार लोणी काळभोर पोलिसात दाखल झाली होती. 

आणखी वाचा - स्वतंत्र भारतात पहिल्यांदा होणार महिलेला फाशी

सदर महिलेला यांच्याकडे गणेश कांरडे याच्याबाबत कसलीही माहिती नव्हती. त्याने सदर महिला यांना ज्या नंबरवरुन संपर्क  केला त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण  तो  क्रमांक फक्त सदर महिला यांच्याशी संपर्क करण्यासाठी वापरला होता. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. दरम्यान, पोलिसांनी २६ जानेवारीतील सदर महिला यांना आलेल्या सर्वच फोनची पडताळणी केली असता, एक संशयास्पद नंबर पोलिसांना आढळून आला. या संशयास्पद नंबरच्या आधारे पोलिस करमाळा तालुक्यातील श्रीपुर येथे पोचले. या ठिकाणी अधिक चौकशी केली असता, गावातील कांही नागरिकांनी गणेश याच्या हालचालीबद्दल संशय व्यक्त केला होता. हाच धागा पकडून पोलिसांनी गणेशला अटक केली आहे.

पोलिसांनी गणेश कांरडे याच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना विविध मोबाईल कापण्यांचे पंधराहून अधिक सीमकार्ड व मोबाईल फोन आढळून आले आहेत. तसेच संबधित मोबाईल फोनमध्ये अनेक आर्थिक दृष्ट्या सधन असलेल्या महिलांचे फोननंबर आढळून आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली राजु महानवर करत आहेत.

हेही वाचा - तुमची त्वचा जळजळतीय?; 'हे' उपाय करुन पहा, निश्चित आराम मिळेल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates : धामणगाव येथे नदीच्या पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

Jalgaon Crime : जळगावमध्ये 'गँगवार', राज शाळेजवळ तरुणावर कोयता, चॉपरने हल्ला

SCROLL FOR NEXT