पुणे

मंचर येथे महिलेचा विनयभंग; डायग्नोस्टीक सेंटरमधील एकास अटक

डी. के. वळसे पाटील

मंचर : कोरोना विषाणू संसर्गाची तपासणी व छातीचे एक्स-रे काढण्यासाठी मंचर येथील डायग्नोस्टीक सेंटरमध्ये गेलेल्या ४१ वर्षांच्या महिलेचा टेक्निशियनने विनयभंग केल्याची  घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने मंचर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ८) रोजी टेक्निशियन नागोराव मारुती काळे (रा. डोबीमळा-मंचर, ता. आंबेगाव. मुळगाव परभणी) याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी ताबोडतोब आरोपी काळेला अटक करण्यात आली आहे.

पुणे-नाशिक रस्त्यावर अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे राहत असलेल्या महिलेचे गेल्या काही दिवसांपासून अंग दुखत होते. तिला सतत तापही येत होता. मंचर येथील एका खासगी रुग्णालयात सदर महिला उपचार घेत होती. डॉक्टरांनी महिलेला कोरोनाची तपासणी व छातीचा एक्स-रे काढण्यासाठी डायग्नोस्टिक सेंटर येथे जाण्याविषयी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संबंधित महिला तिच्या पतीबरोबर मंगळवार (ता. २२ सप्टेंबर) रोजी सेंटरमध्ये गेली. महिलेच्या पतीला बाहेर थांबवून महिलेला एक्स-रे काढण्यासाठी टेक्निशियनने आत खोलीत बोलविले. तेथे लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन आरोपीने केले. त्यावेळी संबंधित महिलेने त्याला ढकलून खोलीच्या बाहेर आली. घाबरली असल्याने तिने हा प्रकार लगेच कोणाला सांगितला नाही. मात्र नंतर तिने सर्व प्रकार तिच्या पतीला सांगितला.

दरम्यान, शनिवार (ता. २६ सप्टेंबर) रोजी डायग्नोस्टिक सेंटर येथे जाऊन घडलेल्या प्रकार सदर महिलेने व तिच्या पतीने डॉक्टरांना सांगितला. डॉक्टरांनी टेक्निशियनला बोलून घेवून. महिलेने केलेल्या तक्रारी विषयी जाब विचारला. पण आरोपी काळेने “मी काही केलेले नाही. तुम्हाला काय करायचे ते करा.” असे सांगितले. त्यानंतर काळे निघून गेला. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेंद्र अहिरे तपास करत आहेत.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT