पुणे

बारामतीकरांनो, महावितरणच्या वतीने तुमच्यासाठी महत्वाचा उपक्रम

मिलिंद संगई

बारामती : महावितरणच्या बारामती विभागांतर्गत येणाऱ्या सोमेश्वर उपविभागातील कुरणेवाडी, वाघळवाडी, निंबुत, चोपडज, आंबी बुद्रुक व नारोळी या सहा गावांत महावितरणने शुक्रवारी (ता. 20) दिवसभर ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम राबवून वीज ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्याचा वेगळा प्रयत्न केला. 

मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून एक गाव एक दिवस हा उपक्रम सुरु झाला आहे. हा उपक्रम आता राज्यभर राबविला जात आहे. अत्यंत नियोजनबद्ध असा हा उपक्रम असून, एकाच दिवशी त्या गावांतील समस्यांवर काम केले जाते.

सोमेश्वर उपविभागात शुक्रवारी मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे यांच्या उपस्थितीत कुरणेवाडी, वाघळवाडी, निंबुत, चोपडज, आंबी बुद्रुक व नारोळी या गावांमधील समस्या निकाली काढण्यासाठी या उपक्रम घेण्यात आला. कंत्राटदारांचे 88 व महावितरणच्या 72 अशा 160 कर्मचाऱ्यांनी या उपक्रमांत प्रत्यक्ष सहभाग घेतला. या सोबतच सोमेश्वरचे उपविभागीय अभियंता सचिन म्हेत्रे  व त्यांच्या शाखा अभियंत्यांनीही परिश्रम घेतले. 

या दिवशी सैल तारांना ताण देणे, तारांना लागणाऱ्या फांद्या झाटणे, रोहित्रांची व पेट्यांची दुरुस्ती करणे, फ्यूज बदलणे, केबल बदलणे, कट पॉईंटच्या जंपिंग करणे, झुकलेले खांब सरळ करणे, आवश्यक ठिकाणी स्पेसर्स व ताण बसविणे तसेच नवीन कनेक्शनसह विजेच्या वैयक्तिक तक्रारी दूर करणे अशा बहुतांश समस्यावर काम करण्यात आले.

कामाच्या प्रारंभी मुख्य अभियंता पावडे यांनी गावातील वीज ग्राहकांना उपक्रमाची माहिती दिली. तसेच विजेच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करुन वीजबिल भरण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सतीश काकडे, बारामती तालुका दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप यांचेसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT