दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात आज एकाच दिवशी तब्बल नऊ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. तालुक्यात मागील ५० दिवसांत १०० जण बाधित झाले आहेत व त्यापैकी ५४ जण उपचारानंतर बरे झाले आहेत, अशी माहिती दौंड उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी आज (ता. १८) दिली.
दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून १७ जून रोजी १३१ जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी १२८ जणांचा अहवाल आला असून, त्यापैकी ९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, ३ जणांचा अहवाल प्रलांबित आहे. दौंड शहराला लागून असलेल्या लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील वेताळनगर येथे एका कुटुंबातील ४, दौंड शहरातील तुकाईनगरमधील २, शहरातील दत्त मंदिर येथील १, राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक पाचमधील १ पोलिस व गट क्रमांक सात मधील १ पोलिस, असे एकूण नऊ जणांना बाधा झाली आहे. या सात बाधितांपैकी एसआरपीएफचे दोन पोलिस यांना पुणे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. तर, उर्वरित सात जणांवर दौंड शहरातील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॅा. संग्राम डांगे यांनी दिली.
मुंबई येथे बंदोबस्त करून दौंड तालुक्यात परतलेल्या एसआरपीएफ गट क्रमांक पाच व गट क्रमांक सातच्या तुकडींचे नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी ९ ते १८ जून या कालावधीत १८ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी ०५ जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.