online-Table-Booking.jpg
online-Table-Booking.jpg 
पुणे

पुणे : ऑनलाईन टेबल बुक करणे पडले तब्बल एक लाखाला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी ऑनलाईन टेबल बुकींग करण्याचा बहाणा करून अनोळखी व्यक्तीने एका महिलेस तब्बल एक लाख रुपयांना गंडा घातला. हा प्रकार तीन ऑक्‍टोबरला घडला असून याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पर्वती पायथा येथे राहणाऱ्या 29 वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन दत्तवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करार न केल्यास पाणीपट्टी दुपटीने आकारणार

वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकांना गर्दीमुळे जास्त वेळ ताटकळत बसण्याची वेळ येऊ नये, यासाठी टेबलाची ऑनलाईन पद्धतीने आगाऊ नोंदणी करण्याचे काम काही कंपन्यांकडून केले जाते. त्यानुसार, फिर्यादी यांनाही हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जायचे होते. त्यानुसार, त्यानुसार त्यांनी इंटरनेटद्वारे हॉटेलची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

#RighttoService आधी 'मेवा' मग 'सेवा'!

दरम्यान, त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. एका नामांकीत हॉटेलचे नाव सांगून फिर्यादी यांना जेवण करण्यासाठी ऑनलाईन टेबल बुकींग करायचे असल्यास त्यांना 25 रुपये भरावे लागतील. हे पैसे आपण पाठविलेल्या मेसेजवर दिलेल्या लिंकमधील माहितीनुसार भरावेत, असे त्याने सांगितले. त्यानुसार, फिर्यादींना एक मेसेज आला. त्यावर एक लिंक पाठवुन त्यामध्ये माहिती भरली, त्याबरोबरच त्यांच्याकडील बॅंक खात्याबाबतच्या गोपनीय माहिती घेऊन युपीआय पीन क्रमांकही टाकण्यास सांगितल्याने त्यांनी तो क्रमांकही टाकला. दरम्यान, फिर्यादीच्या बॅंक खात्यातील तब्बल एक लाख रुपये अचानक अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याचा मेसेज त्यांना आला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेऊन याप्रकरणी फिर्याद दिली. 

वाढत्या फॅशनमुळे ब्यूटिपार्लर तेजीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT