hospital1.jpg 
पुणे

स्वत:वर धारदार कात्रीने `त्याने` केले वार, मग पोलिसांनी वेळीच..

बाबा तारे

औंध (पुणे) : सध्या कोरोनाच्या भीतीने रुग्णांना किंवा जखमींना मदत करण्यासाठीसुद्धा कोणी समोर येत नसल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. परंतु, प्रशासकीय यंत्रणा मात्र आपले कर्तव्य बजावतांना दिसत आहेत. औंध मधील जयराम रमेश गायकवाड (वय ४२) या व्यक्तीने स्वत:वर धारदार कात्रीने वार करुन घेतले व यात तो गंभीर जखमी झाला. संबंधित व्यक्ती सिद्धार्थ नगर लेन नंं. १ शौचालयाच्या पहिल्या मजल्यावर गंभीर अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे मार्शल दत्ता गेंगजे व प्रविण शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन त्याला दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला परंतु एकही रुग्णवाहिका चालक यायला तयार नव्हता. वेगवेगळी कारणे देत येण्यास टाळाटाळ केली गेली. यानंतर पोलीस ठाण्यात संपर्क करुन तेथील टु-मोबाईल व्हॅन मागवली. यामधील कर्मचारी वंदू गिरे व किशोर शिखरे यांनी स्थानिक नागरिकांना मदतीसाठी बोलावले असता कोरोनाच्या भीतीने कोणीही  मदतीला आले नाही.

त्याच्या पोटातून रक्त वाहत असल्याने पोलिसांनी त्याला पहिल्या मजल्यावरुन स्ट्रेचरवर खाली आणले. आणि तातडीने औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने संबंधिताचे प्राण वाचले परंतु नागरिकांनी मदत न करता केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने कोरोनाचा प्रभाव अजूनही लोकांमध्ये असल्याचे दिसून आले आहे. पोलीस कर्मचारी दत्ता गेंगजे, प्रविण शिंदे, वंदू गिरे व किशोर शिखरे यांनी याप्रसंगी उत्तम कामगिरी बजावली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

Gold Rate Today: सप्टेंबरअखेर सोनं 11 हजारांनी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात भाव किती?

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याने इमारतीवरून मारली उडी, प्रायव्हेट पार्ट कापलेला; वृंदावनात घटनेने खळबळ!

SCROLL FOR NEXT