One person was seriously injured after falling into a ten-foot ditch with his bike in the dark 
पुणे

सिंहगड रस्ता ठरतोय जीवघेणा; अंधारात दुचाकीसह दहा फूट खड्ड्यात पडून 1 गंभीर जखमी

निलेश बोरुडे

किरकटवाडी( पुणे ): रात्रीच्या अंधारात खड्ड्याचा अंदाज न आल्याने एक व्यक्ती दुचाकीसह तब्बल दहा फूट खोल खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील कोंढाणा हॉटेल जवळ घडली आहे. सकाळी रस्त्यावरून जाताना खड्ड्यातून रडण्याचा आवाज येत असल्याने काही नागरिकांनी डोकावून पाहिले असता ही घटना उघड झाली. दरम्यान ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सिंहगड रस्ता अत्यंत जीवघेना व धोकादायक बनला आहे.

देशात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण; बरे होण्याचेही प्रमाणही...

सध्या सिंहगड रस्त्याचे काम सुरू आहे. जागोजागी ठेकेदाराने मूळ रस्ता खोदून ठेवलेला आहे. एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. ज्या ठिकाणी रस्त्याच्या किंवा पुलाच्या कामासाठी खोदकाम करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी ठेकेदाराने सुरक्षा पट्टी बांधलेली नाही किंवा बॅरिकेट्स ठेवलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना अंदाज न आल्याने मागील काही दिवसांमध्ये अनेक अपघात घडले आहेत. गोहे बुद्रुक येथेच मागील आठवड्यामध्ये अपघात होऊन दोन नागरिकांना गंभीर दुखापत झाली होती. तसेच किरकटवाडी फाटा ते नांदेड फाटा या दरम्यानही अनेक दुचाकी व चारचाकी वाहने खोदलेल्या खड्ड्यांमध्ये जाऊन अपघात झाले आहेत.

गोऱ्हे बुद्रुक गावाच्या हद्दीत कोंढाणा हॉटेल जवळ पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. दहा फुटांपेक्षा जास्त खोल खड्डा याठिकाणी खोदण्यात आलेला आहे. खोदलेल्या खड्ड्यामध्ये मोठ्या लोखंडी सळया आणि पाईप अस्ताव्यस्त पडलेले आहेत. याठिकाणी वळण असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. तसेच ठेकेदाराने योग्य ती काळजी घेतलेली नाही. त्यामुळे रात्रीच्या अंधारात दुचाकीवरील व्यक्ती थेट खड्ड्यात जाऊन पडली. आतमध्ये असलेल्या सळया व लोखंडी पाईप लागून हा व्यक्ती गंभीर जखमी होऊन खड्ड्यातच पडून होता. सकाळच्या वेळी या ठिकाणावरून जात असताना सौरव कुलकर्णी, चंद्रकांत जाधव व इतर नागरिकांनी या जखमी व्यक्तीला खड्ड्यातून बाहेर काढले व उपचारांसाठी खाजगी वाहनातून दवाखान्यात पाठवण्यात आले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे जखमी व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. गंभीर जखमी असल्याने अपघातग्रस्त व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. संबंधित व्यक्तीची होंडा पॅशन दुचाकी एम एच 12 ईझेड 0523 खड्ड्यातच पडून आहे.

जाहिरातींचे होर्डिंग पुणेकरांच्या जिवावर;अपघातांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्‍चित करा

"अगोदरच ठेकेदाराने कामाला विलंब केला आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदारावर कोणतीच कारवाई करत नाहीत. संबंधित ठेकेदारावर मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे."
- सुशांत खिरिड, नागरिक गोऱ्हे बुद्रुक.

"ज्या ठिकाणी खोदकाम सुरु आहे तेथे तात्काळ संरक्षक पट्टी बांधण्यास ठेकेदारास सांगितले जाईल. अपघात होऊ नयेत म्हणून आवश्यक त्या ठिकाणी योग्य उपाययोजना ठेकेदाराकडून करुन घेण्यात येतील."
-ज्ञानेश्वर राठोड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT