One seriously injured during firing on a house in Pune 
पुणे

थरारक! पुण्यात एका घरावर अंदाधुंद गोळीबार; एक गंभीर जखमी

निलेश बोरुडे

किरकटवाडी(पुणे): खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या लांडगे वस्ती येथील राजू चंदू सोनवणे याच्या घरावर तीन अज्ञात व्यक्तींनी काल रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान अंदाधुंद गोळीबार केला असून खंडू लक्ष्मण चव्हाण ( वय 22) याच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यातून राजू सोनवणे, त्याची पत्नी व दोन लहान मुले थोडक्यात बचावले आहेत. तीन हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलांमधून तब्बल पंधरा राऊंड फायर केले. ही संपूर्ण घटना घराच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा
 

अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला व सध्या फरार असलेला सराईत गुन्हेगार चेतन लिमन याने त्याच्या हस्तकाच्या फोनवरून राजू सोनवणे याच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. राजू सोनवणे हा अवैध व्यवसायिक असून छुप्या पद्धतीने गांजा व ताडीची विक्री करतो. यापूर्वीही चेतन लीमन याने राजू सोनवणे याला धमकावून वीस हजार रुपये घेतले होते. यावेळी पैसे देण्यास नकार दिल्याने ''दोन दिवसांमध्ये तुझा मर्डर करतो'' अशी धमकी फोनवरून चेतन लिमन याने राजू सोनवणेला दिली होती. त्यानुसार रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी गावठी पिस्तुलाने घराच्या दरवाजावर व खिडकीवर तब्बल पंधरा राऊंड फायर केले. यामध्ये राजू सोनवणे याच्याकडे काम करणाऱ्या खंडू लक्ष्मण चव्हाण याच्या डोक्याला गोळी लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून धायरी येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

पुण्यातल्या `त्या` भीती वाटणाऱ्या जागा अन् कीर्ररररर....शांतता!

घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील व हवेली उपविभागाच्या पोलीस उपअधिक्षीका सई भोरे-पाटील यांना तातडीने घटनास्थळाला भेट देण्यास सांगितले आहे. चेतन लिमन व इतर अज्ञात पाच हल्लेखोरांवर कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन व हवेली पोलिस स्टेशनचे एक अशी एकूण तीन पथके रवाना करण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम हे करत आहेत.

अरे बापरे ! मार्केट यार्डात पुणेकरांची झुंबड; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा       

अवैध व्यवसायांमुळे खडकवासला परिसरात वाढत चाललेली गुन्हेगारी पुन्हा एकदा तोंड वर काढताना दिसत आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बारामती तालुक्‍यात कोरोनाची मुंबई मार्गे पुन्हा एन्ट्री...  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Update: अमेरिका-इराण युद्धामुळे बाजार कोसळला, पण 'या' सेक्टरमधील शेअर्समध्ये जोरदार उसळी; 13% पर्यंत वाढ! कारण काय?

वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पराभव जिव्हारी, पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूला भरावा लागणार मोठा दंड; PCB करणार वसुली

Jalgaon Accident : आनंदाचा सोहळा ठरला अखेरचा; निवृत्तीचा कार्यक्रम आटोपून परतताना काळाचा घाला

T20 WC, IND vs WI: 'संजू सॅमसन वर्ल्ड-क्लास खेळाडू...' गौतम गंभीरने नाबाद ९७ धावांनंतर गायले गोडवे; काय म्हणाला पाहा Video

Sindhudurg Holi Festival : कोकणच्या शिमग्यात मिठाचा खडा? प्रशासनाकडून 'या' वादग्रस्त गावांवर निर्बंध; सिंधुदुर्गात 1136 ठिकाणी होणार होळी पूजन

SCROLL FOR NEXT