पुणे

थेऊर येथील धक्कादायक घटना; चार जणांनी केली कोयत्याने मारहाण 

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हजारो लोकांच्या गर्दीसमोर चार जणांनी एका एकवीस वर्षीय तरुणावर धारदार कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना थेऊर (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता. २६) संध्याकाळी सातच्या सुमारास घडली.

प्रजाकसत्तादिनाच्या सुट्टीनिमित्त थेऊरच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भावीकांनी हा थरार डोळ्यानी पाहिला. चिंतामणीच्या मंदीराजवळील दुकानासमोरील भऱगर्दीत कोयत्याने हानामारी होत असल्याने, दर्शनासाठी आलेल्या भावीकात भितीचे वातावरण पसरले होते. 

आकाश मधुकर भंडारी (वय २१, रा. थेऊर, ता. हवेली) हे त्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असुन, या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अक्षय धनंजय सोनवणे, बाबु, मंदार सकट याचा भाऊ व एक अनोळखी अशा चार जनांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आकाश व अक्षय या दोघात एक वर्षापुर्वी किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन, 
वरील चौघांनी राडा घातल्याचे स्पष्ठ झाले आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश भंडारी याचे थेऊर येथील चिंतामणी मंदीराजवळ मोबाइल विक्रीचे दुकान आहे. एका मुलीच्या प्रेमप्रकरणातून बंटी रणदिवे याला आकाश याने एक वर्षापुर्वी म्हणजे 26 जानेवारीला समज दिली होती. यावरुन वरील चौघात वाद होता.

दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आकाश व त्याचा मित्र शुभम मोबाईलच्या दुकनात काम करत असताना, अक्षय सोनवणे व बाबु या दोघांनी दुकानात जाऊऩ, आकाशला कोयत्याच्या साह्याने मारहान करण्यासक सुरुवात केली. यावर आकाश याने जिव वाचवण्यासाठी  विठ्ठल - रुक्मीणी मंदीराकडे धाव घेतली. यावर वरील चौघांनी हातात कोयता घेऊऩ आकाशचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दी पाहुन चौघेही पळून गेले. त्यानंतर आकाशच्या नातेवाईकांनी आकाश ला लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक सूरज बंडगर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: मॅचच्या काही तास आधी मोठं संकट! इकाना स्टेडियमजवळ गोमतीचं पाणी, अंडरपास जलमय; भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह?

Satara District Bank: दहा वर्षांच्या संचालकपदाचा मुद्दा तापला; सातारा जिल्हा बँक निवडणुकीत सात हरकती, वकिलांचा जोरदार युक्तिवाद

UPPCS interview: कोट नीट केला, केस विंचरले, मिठाई भरवली; UPPCS मुलाखतीआधी वडिलांचा हा निरोप पाहून डोळे पाणावले, व्हिडिओ व्हायरल

Marathi News Live Updates: विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न, त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही; लोकसेवा आयोगाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Nagpur Crime: मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख, प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप; १७ वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी तरुणावर पॉक्सो

SCROLL FOR NEXT