पुणे

दौंड : बिरोबावाडी येथे अपघात; पत्नीचा मृत्यू तर पती जखमी

अमर परदेशी

पाटस : पाटस-दौंड राज्यमार्गावर बिरोबावाडी हद्दीत टॅंकर व दुचाकी यांच्यात धडक होवून झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर जखमी झाल्याची दुदैवी घटना घडली.

दरम्यान, गुरुवारी (ता. १४) सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला. कावेरा मनोहर देडगे (वय ५५, रा. उस्मानाबाद, ता. परांडा) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मनोहर देडगे (वय ६०) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत मनोहर देडगे यांनी पाटस पोलिस चौकीत फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देगडे दांपत्य हे सकाळी दुचाकीवरुन पाटसवरुन दौंडकडे जात होते. बिरोबावाडी हद्दीत येताच देडगे यांच्या दुचाकीला समोरुन येणाऱया टॅंकरची धडक बसली. काही क्षणातच दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या कावेरा रस्त्यावर पडल्या. यावेळी ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मनोहर हे थोडक्यात बचावले मात्र त्यांना दुखापत झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परीसरातील नागरीकांनी व इतर वाहनचालकांनी जखमी मनोहर यांना तत्काळ उपचारासाठी पाठवून दिले. पाटस पोलिस चौकीतील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कावेरा यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान, अपघातानंतर संबधित टॅंकर चालकाने पळ काढला. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टॅंकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis on Thackeray Unity : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर फडणवीस काय म्हणाले? 'ठाकरेंचा ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचाराचा'

VIJAY HAZARE TROPHY : पहिली धाव अन् विराट कोहलीच्या नावावर मोठा पराक्रम; सचिन तेंडुलकरनंतर असा विक्रम करणारा भारतीय

BMC Election: शरद पवारांच्या पक्षाने फुंकली ‘तुतारी’! महापालिकांसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

PCMC Election : पुढील आठ दिवस लगबगीचे; महापालिका निवडणूक उमेदवारी अर्ज वितरण; स्वीकृती सुरू

अक्षय खन्ना आता फुल्ल हवेत! धुरंधर सिनेमानंतर ट्रेण्डवर येताच 'दृश्यम 3'साठी मागितली मोठी फी, सिनेमा सोडल्याचा दावा

SCROLL FOR NEXT