पुणे

अकरावीची "एफसीएफएस' फेरी उद्यापासून 

सकाळवृत्तसेवा

पुणे -  पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 304 कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (एफसीएफएस) फेरीचे वेळापत्रक सोमवारी जाहीर केले आहे. 43 हजार 175 रिक्त जागांसाठी ही फेरी 13 ते 31 जानेवारी दरम्यान होणार आहे. 

एफसीएफएस फेरीसाठी विद्यार्थ्यांचे टक्केवारीनुसार सात संवर्ग केले आहेत. या संवर्गाप्रमाणे ही फेरी टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल. सातही संवर्गातील प्रवेश झाल्यानंतर 31 जानेवारीला सर्वसाधारण अंतिम रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्या झाल्या. यात 63 हजार 915 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 

"एफसीएफएस'साठी हे असतील पात्र 

- प्रवेश अर्ज भाग-एक भरून प्रमाणित केलेले विद्यार्थी 
- यापूर्वी कोणत्याही प्रवेश फेरीत प्रवेश न मिळालेले 
- प्रवेश रद्द केलेले अथवा प्रवेश नाकारलेले विद्यार्थी 
- पुरवणी परीक्षा डिसेंबर 2020मध्ये दहावी उत्तीर्ण 
- मार्च अथवा डिसेंबरमध्ये एटीकेटी मिळालेले 

फेरीसाठी गुणवत्तेनुसार संवर्ग 
- पहिला संवर्ग : 90 टक्के व त्यापुढील (450 ते 500 गुणांक) 
- दुसरा संवर्ग : 80 टक्के व त्यापुढील (400 ते 500 गुणांक) 
- तिसरा संवर्ग : 70 टक्के व त्यापुढील (350 ते 500 गुणांक) 
- चौथा संवर्ग : 60 टक्के व त्यापुढील (300 ते 500 गुणांक) 
- पाचवा संवर्ग : 50 टक्के व त्यापुढील (250 ते 500 गुणांक) 
- सहावा संवर्ग : दहावी उत्तीर्ण असलेले सर्व 
- सातवा संवर्ग : एटीकेटी मिळालेले आणि दहावी उत्तीर्ण 

प्रवेश फेरीचे वेळापत्रक 

तपशील आणि गुणवत्तेच्या संवर्गानुसार प्रवेशाचा कालावधी 

तपशील : पहिला संवर्ग : दुसरा संवर्ग : तिसरा संवर्ग : चौथा संवर्ग : पाचवा संवर्ग : सहावा संवर्ग : सातवा संवर्ग* 
1) संबंधित संवर्गातील विद्यार्थी या वेळी एफसीएफएस अंतर्गत ऍलॉटमेंटसाठी अर्ज करू शकतील : 13 जानेवारी (स.10 ते रात्री 8 पर्यंत) : 16 जानेवारी : 19 जानेवारी : 21 जानेवारी : 23 जानेवारी : 27 जानेवारी : 29 जानेवारी 

2) ऍलॉटमेंट मिळालेले विद्यार्थी "प्रोसिड फॉर ऍडमिशन'वर क्‍लिक करून संबंधित विद्यालयामध्ये प्रवेश निश्‍चित करतील : 13 ते 15 जानेवारी : 16 ते 18 जानेवारी : 19 ते 20 जानेवारी : 21 ते 22 जानेवारी : 23 ते 25 जानेवारी : 27 ते 28 जानेवारी : 29 ते 30 जानेवारी 

3) झालेले प्रवेश संकेतस्थळावर नोंदविण्यासाठी विद्यालयांना अतिरिक्त वेळ : 15 जानेवारी : 18 जानेवारी : 20 जानेवारी : 22 जानेवारी : 25 जानेवारी : 28 जानेवारी : 30 जानेवारी 

विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://pune.11thadmission.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT