online education
online education sakal
पुणे

ऑनलाइन शिक्षणात लिखाणाचा सराव होतोय कमी!

मीनाक्षी गुरव

पुणे : नामांकित आयटी कंपनीत काम करणारी हर्षा पाटील सध्या घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करत आहे. तिचा नऊ वर्षांचा मुलगा सध्या मोबाईलद्वारे ऑनलाइन शिक्षण घेत आहे. त्याबद्दल ती सांगते, ‘‘शाळेकडून त्याला लिखाणाचे प्रकल्प दिले जातात. परंतु त्याची गृहपाठाची वही तपासताना लक्षात आले की त्याला जोडअक्षरे लिहिताना अडचण येत आहे. त्याशिवाय स्वल्पविराम, पूर्णविराम यात तो सातत्याने चुका करतोय. खरंतर शाळेत शिक्षिका गृहपाठाची वही नियमित तपासताना शेरा देतात, त्यावेळी आपण आवर्जून ते तपासतो. परंतु आता ऑनलाइन शिक्षणात अशा बारीक-बारीक पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी नजरेआड जात आहेत.’’

शाळेत (ऑफलाइन) बाकड्यावर बसून हातात पेन्सिल किंवा पेन व्यवस्थित पकडून शिस्तबद्धपणे लिहायची सवय विद्यार्थ्यांना लावली जाते. त्याशिवाय प्रत्यक्ष शाळेत शिकताना गृहपाठ तपासणे, नोंद वही पाहणे, शाळेतील वह्या वर्गात पाहणे याद्वारे मुलांच्या लिखाणाकडे वर्ग शिक्षकांचे बारीक लक्ष असते. मुलांच्या लिखाणात सुधारणा व्हावी, म्हणून शिक्षक वर्गात वेळोवेळी सूचना देतात. शिवाय वह्यांमध्ये शेरा देतात, जेणेकरून पालकांच्याही ते लक्षात यावे. परंतु आता शाळा सुरू नसल्याने हे अशक्य आहे. त्यामुळे मुलांचा लिखाणाचा सराव, वयानुसार हस्ताक्षरात होणारे बदल, शुद्धलेखन हे नजरेआड जात आहे. यात आता पालकांनाच शिक्षकांची भूमिका बजवावी लागणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लिखाणातील बदलाचे परिणाम...

  • वयानुसार हस्ताक्षरात होणारी प्रगती खुंटतेय

  • लेखनातीलच्या चुकांमध्ये वाढ

  • लिखाणाचा सराव झाला कमी

  • लिखाणाचा वेगही मंदावला

  • बोटाचे, मनगटाचे वळण बिघडतंय

  • लिखाणासंबंधित उपक्रम झाले कमी

हस्ताक्षर सुधारण्यासाठी...

  • उभ्या-आडव्या रेषा, गोलाकार चिन्हे रेखाटने

  • सर्व अक्षरे एकसारखी लिहायला सांगणे

  • अक्षरांची उंची सारखी ठेवण्यावर

विशेष भर द्यावा

  • वळणदार लिखाणावर भर द्यावा

  • पेन्सिल, पेन पकडण्याची योग्य पद्धत ठेवावी

  • विविध हस्ताक्षरांची पुस्तके मुलांसमोर ठेवावी

ऑनलाइन शिक्षणात विविध प्रकारच्या गॅझेटच्या वापरामुळे मुलांना लिखाणाचा आनंद घेता येत नाही. दुसरीपर्यंत मुलांच्या लिखाणाची फारशी काळजी करू नये, हे खरे असले तरी ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. याकडे पालकांनी संधी म्हणून पाहावे आणि मुलांना लिखाणाची सवय लावावी. लिहायच्या सरावामुळे बोट, मनगटाला योग्य वळण लागते.

- ओंकार पाटील, संचालक, अक्षर आनंद हस्ताक्षर वर्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT