dimbhe dam 
पुणे

कुकडी प्रकल्पावरील शेतकऱ्यांची उडाली झोप 

युनूस तांबोळी

टाकळी हाजी (पुणे) : कुकडी पाटबंधारे विभागात असणाऱ्या आठ धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाणी साठा आहे. पुढील दोन महिन्यात पावसाचे प्रमाण वाढले नाही, तर मात्र कमी पाण्यावर पिकणारी पिके व पिण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाअंतर्गत आठमाही पाणी मिळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.     

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
कुकडी पाटबंधारे विभागातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे, विसापूर, चिल्हेवाडी, घोड या धरणांचा समावेश होतो. साधारण 14 आॅक्टोबरदरम्यान खरीप हंगाम संपतो. या काळात शेतकरी पाण्याचे व्यवस्थापन करून खरीप हंगामातील पिके पावसावर घेत असतो. त्यामुळे या काळात पाण्याची धरणातून अधिकची गरज भासत नाही. 15 आॅक्टोबरनंतर रब्बी हंगामाला सुरूवात होते. या नंतर रब्बी हंगामातील आर्वतनाला सुरवात होत असते. त्यामुळे या पुढील आठ महिने पाण्याची उपलब्धता असणे गरजेचे असते. 1 मार्च ते 3 जूनपर्यंत उन्हाळी हंगाम असतो. या काळात पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. या काळात बहुतेक धरणाच्या कार्यक्षेत्रात पाण्याची उपलब्धता होणे गरजेचे असते. या काळात पाटबंधारे विभाग अधिक काळजीने पाण्याचे व्यवस्थापन करते. 

कुकडी पाटबंधारे विभागात असणाऱ्या गावांमध्ये याच काळात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असतो. गेल्या वर्षी कुकडी पाटबंधारे विभागातील धरण क्षेत्रात 87.15 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, या वर्षी आजतागायत 30.74 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातून धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. या पुढील दोन महिण्याच्या कालावधीत पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास पुढील वर्षीच्या शेती व्यवसायाच्या नियोजनात आमूलाग्र बदल शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. यामुळे आतापासून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. धरणामधून दरवर्षी पाण्याचे व्यवस्थापन करून आठमाही पाणी दिले जाते. पुढील काळात पाऊस झाला नाहीतर कमी पाण्यावर असणारी पिके घेऊन सर्वांनी नियोजन करणे आवश्यक आहे.  
 - प्रकाश वायसे
अध्यक्ष, मीना सिंचन शाखा पाणी वापर संस्था, शिरूर 

सध्यातरी या वर्षी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी कुकडी प्रकल्पात साधारण 87.15 एवढा पाणी साठा झाला होता. त्यामुळे रब्बी व उन्हाळी आवर्तनात पाणी व्यवस्थापन करणे सोपे गेले. या वर्षी मात्र पाऊस व धरण साठ्यावर नियोजन करणे अवघड होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या परीस्थीतीचा अभ्यास करून पिके व पाण्याचे नियोजन करावे. 
 - प्रशांत कडूसकर,  कार्यकारी अभियंता,
कुकडी पाटबंधारे विभाग क्र. 1 नारायणगाव

                       
                          

कुकडी पाटबंधारे विभागातील पाणीसाठा
धरण  प्रकल्प साठा (टीएमसी)   पाणी साठा(टीएमसी)   टक्केवारी
घोड 4.873 2.237 45.91
डिंभे 12.50  5.98 47.85  
येडगाव   1.94 0.76   39.35  
माणिकडोह 10.18   1.80 17.66
वडज    1.17 0.58 49.58  
पिंपळगाव जोगे 3.89    0.00 मायनस- 16.91 
विसापूर 0.922 0.244 24.71
चिल्हेवाडी   0.803   0.338 40.87
एकूण  29.64     9.12 30.74


                                     
                                 
                                 
                                 
                        
                                   
                               
                                       
 
                         

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंचं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन

Income Tax Refund : तुमचा ITR अडकलाय? आयकर विभागाचे मेल का येत आहेत? ‘Risk Management’ म्हणजे काय?

Sillod Crime News : येथे माणुसकी ओशाळली ! वृद्धेचा हार्ट अटॅकने मृत्यू , मैत्रिणीने अंगावरचे दागिने चोरले अन् मृतदेहाची लावली विल्हेवाट

Zomato Offer : झोमॅटो युजर्सची लागली लॉटरी! आता जेवण ऑर्डर केल्यानंतर पैसे मिळणार परत, पाहा काय आहे ट्रिक

गौतमीला लागलं FA9LA गाण्याचं वेड, हायवेवरच केला अक्षय खन्नाच्या ट्रेडिंग गाण्यावर भन्नाट डान्स, Viral Video

SCROLL FOR NEXT