Corona Patient Sakal
पुणे

Corona Patients : पुण्यात उरले अवघे १८ कोरोना रुग्ण

पुणे शहर जिल्ह्यात सुमारे तीन वर्षांपूर्वी हाहाकार माजविणारा कोरोना संसर्ग आता पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर जिल्ह्यात सुमारे तीन वर्षांपूर्वी हाहाकार माजविणारा कोरोना संसर्ग आता पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर आला आहे. सध्या शहरात केवळ १८ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. यापैकी केवळ चार रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. याउलट पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व नगरपालिका, कटक मंडळे (कॅंटोन्मेंट बोर्ड) आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी (ता.३०) शून्य झाली आहे. यामुळे जिल्ह्याचा संपूर्ण ग्रामीण भाग हा आता कोरोनामुक्त झाला आहे.

सध्या पुणे शहर व जिल्ह्यात मिळून एकूण केवळ ३६ सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत. या एकूण रुग्णांपैकी पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी अठरा रुग्णांचा समावेश आहे.दरम्यान, या दोन्ही शहरातील मिळून एकूण ३६ रुग्णांपैकी फक्त सहा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. या सहा रुग्णांमध्ये पुणे शहरातील सहा आणि पिंपरी चिंचवडमधील दोन रुग्ण आहेत. उपचार घेणारे सहा रुग्ण वगळता उर्वरित ३० रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये पुणे शहरातील १४ आणि पिंपरी चिंचवडमधील १६ रुग्ण आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजेच दोन वर्षभरापूर्वी कोरोना उपचारास बेड (खाट) मिळण्यासाठी पुणेकरांना वणवण फिरावे लागत असे. त्याच पुण्यात आता रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणारे अवघे चार कोरोना रुग्ण उरले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने दररोज रात्री पुणे शहर व जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्ण, उपचार घेत असलेले रुग्ण, विलगीकरणातील रुग्ण, उपचारानंतर बरे झालेले रुग्ण आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

दरम्यान, मंगळवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात फक्त १० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील सात आणि पिंपरी चिंचवडमधील तीन रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात आढळून आलेल्या या नवीन रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची ही अवघी ३६ इतकी असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

शहरातील ‘कोरोना’ची आतापर्यंतची स्थिती

- शहरातील कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला --- ९ मार्च २०२०

- कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू --- ३१ मार्च २०२०

- आतापर्यंत आढळून आलेले एकूण रुग्ण --- ६ लाख ९४ हजार २२९

- कोरोनातून बरे झालेले रुग्ण --- ६ लाख ८४ हजार ८४८

- कोरोनाने झालेले एकूण मृत्यू --- ९ हजार ४२३

- कोरोना चाचणी केलेले नागरिक --- ४८ लाख ९६ हजार ९०६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

SCROLL FOR NEXT