opposition party encircles BJP in tender case of Rs 10,000 crore in general Meeting 
पुणे

Video : पुणे: 10 हजार कोटींच्या निविदांवरुन सभेत विरोधांचा ठिय्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणेकरांना चांगल्या सेवा-सुविधा पुरविण्यासाठी काढलेल्या सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या वादग्रस्त निविदांचे प्रकरण चांगले तापले असून, या मुद्यावरून आक्रमक झालेल्या महापालिकेतील विरोधीपक्षांनी सत्ताधारी भाजपला सर्वसाधारण सभेत घेरले. या निविदांची चौकशी करण्याची मागणी करीत विरोधकांनी महापौरांच्या आसनसमोर ठिय्या मांडला. त्यावरून सभागृहात गोंधळ उडाला. 


 

फिल्मीस्टाईलने पाठलाग करत गावठी कट्टा बाळगणाऱ्यास केले अटक

समान पाणीपुरवठा योजने, 'एचसीएमटीआर', 'जायका', कात्रज-कोंढवा रस्त्यासह जलपर्णी आदी कामांच्या फुगविलेल्या निविदा रद्द झाल्याने पुणेकरांचे तब्बल साडेचार हजार कोटी रुपये वाचले आहेत. त्याकडे लक्ष वेधत, या प्रकरणांची चौकशी करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्याचे वृत्त 'सकाळ'ने गेल्या आठवड्यात प्रसिध्द केले.

पिंपरीत भाजपला दणका; महामंडळांवरील तीनही नियुक्‍त्या रद्द

त्यानंतर फेरनिविदा आणि काही निविदा रद्द झाल्याने पुणेकरांचे 4 हजार 600 कोटी रुपये वाचल्याच्या 'सकाळ'च्या वृत्ताची 'सोशल मीडिया'वर प्रचंड चर्चा झाली. त्यातच पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रसेचे नेते अजित पवार यांनी गैरव्यवहारांचे 'सकाळ'मधील वृत्त वाचून दाखवत, या प्रकरणात सरकार गांभीर्याने लक्ष घालणार असल्याचे जाहीर केले होते.


अन् भर रस्त्यात मर्सिडीज कार आगीत जळून खाक 

त्यापाठोपाठ राष्ट्रवादीसह कॉंग्रेस आणि शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरत भाजपची कोंडी करण्यास सुरवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून महापालिकेच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत या तिन्ही पक्षाच्या सदस्यांनी एकत्र येत आंदोलन केले. 

रशियन वैमानिकांनी पुण्यात उडविले सुखोई 30

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Latest Marathi News Updates : जालन्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे कपाशी पीक गेलं पाण्याखाली

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

SCROLL FOR NEXT