marriage 
पुणे

आळंदीत सुरू आहे, चोरी चोरी चुपके चुपके...

विलास काटे

आळंदी (पुणे) : लॉकडाउन काळात बंदी असूनही आळंदीत काही मंडळी चोरून लग्न लावत आहेत. नवरानवरी आणि सोबतचे तीन साक्षीदार, अशी पाच- सात मंडळी पुणे पिंपरी भागातून येत आहेत. रिक्षा अथवा जिप करून वऱ्हाडी येऊन लग्ने लावून जात आहे. एका महाभागाने तर आळंदीकरांचे ग्रामदैवत असलेल्या गावठाणातील भैरवनाथ महाराजांच्या मंदिरतच लग्न लावले. प्रशासनाकडून मात्र काहीच कारवाई झाली नसल्याने सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला आहे.


प्रांताधिकारी संजय तेली यांनी आळंदीत लग्नांना बंदी केली आहे. त्यामुळे शहरातील अनेक मोठे मंगल कार्यालयचालकांने आर्थिक नुकसान झाले. एप्रिल, मे, जुन महिन्यातील ऐन लग्नांचा हंगाम असूनही आळंदीत मंगल कार्यालये लॉकडाउनमुळे ओस पडली. अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. आचारी- वाढपीपासून ब्यूटीपार्लर, बॅण्डवाला, घोडेवाले, भटजी या सगळ्यांना आर्थिक फटका बसला. मोठ्या मंगल कार्यालय चालकांनी लॉकडाउन पाळला. मात्र, काही भुरटे मात्र पळून आलेल्यांची लग्ने कधी इंद्रायणीतीरी घाटावर, तर कधी छोट्या मंदिरात लावत असल्याचे चित्र आहे. पोलिसांचा डोळा चुकवून लग्ने चालू आहेत. काही लोक स्वतःच्या घरातच पाच- दहा लोकांमध्ये लग्ने लावत आहेत. या लग्नामुळे पाच ते दहा हजार रूपये खर्च घेतला जातो. चोरी- छूपे चांगली कमाई मिळत असल्याने अनेकजण छुप्या मार्गाने लग्नाचा विधी करून घेत आहेत. पळून आलेल्या जोडप्याला फक्त विधी हवा असतो. त्यामुळे लग्न कुठे लावले, याचा विचार केला जात नाही. याचा फायदा काही मंडळी घेत आहेत. 

आळंदीत असेच एका महाभागाने आळंदीकरांचे श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ महाराजांच्या मंदिरातच लग्न लावले. लग्नासाठी आळंदी शहराच्या बाहेरून वऱ्हाडे आले होते. घाईघाईत लग्न लाऊन पैसे घेऊन संबंधित भटजी पळूनही गेला. मंदिरात पूजाअर्चा करणारा गुरव मात्र लग्नाकडे टक लावून पाहत होता. मात्र, लग्नाच्या विधीस मज्जाव केला नाही. या मंदिरातील लग्नाचे फोटो मात्र सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यामुळे चोरट्या लग्नाबाबत खूपच चर्चा रंगली. प्रशासनाकडून मात्र यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आळंदीकरांनी प्रशासनावर नाराजी दर्शवली.
  
Edited by : Nilesh Shende

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT