market yard1.jpg
market yard1.jpg 
पुणे

पुणेकरांनो, दीड महिन्यापासून बंद असलेले मार्केट यार्डातील इतर विभाग सुरू होणार पण...

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी, फळे, कांदा-बटाटा, केळी, फुले आणि पान विभाग गेल्या दीड महिन्यापासून बंद आहेत. बंद असलेले हे विभाग सुरू करण्यासाठी बाजार समितीने अडते, हमाल, कामगार, टेम्पो चालकांची मंगळवारी बैठक बोलविली आहे. या बैठकीत बाजारातील बंद विभाग सुरू करण्याबाबत खबरदारी व उपाय-योजनाबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे लवकरच मार्केट यार्डातील बंद असलेले सर्व विभागही सुरू होणार असल्याचे संकेत प्रशासक बी. जे. देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले.

देशमुख म्हणाले, गूळ-भुसार बाजारात काही व्यापाऱ्यांना कोरोनाची लागणं झाली होती. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मागील मंगळवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला होता. मात्र भुसार विभागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच विविध उपाय योजना करून येत्या सोमवारपासून बाजार सुरू होणार आहे. व्यापारी, हमाल, खरेदीदारांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. बाजारात येणाऱ्या ग्राहकांत 3 ते 4 फुटांचे अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे. बाजारात धान्याचे कीट तयार करण्यास बंदी. आवक झालेली वाहने सायंकाळी 5 पर्यंत खाली करून घ्यावी.

सायंकाळी 6 नंतर बाजारात थांबण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहरातील बाधित क्षेत्रातील नागरिकांना बाजारात बंदी असणार आहे. भुसार मालाची दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उघडी असणार आहेत. सुकामेवा व पुरक दुकाने सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत उघडण्यात येतील. शेतीमालाची आवक बंद असणार आहे. बाजारात रोज 100 वाहनांनाच परवानगी दिली जाणार आहे. गेट क्रमांक पाचमधून वाहनांना प्रवेश दिला जाईल. बाहेर जाणार्‍या वाहनांना इतर गेटचा वापर करता येणार आहे. भुसार विभागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच बाजार सुरू झाल्यानंतर वाहनांची तसेच खरेदीदारांनी गर्दी टाळण्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. कोरोना बाधित क्षेत्रातील खरेदीदार आणि कामगारांना बाजारात प्रवेश बंदी असणार आहे. दुकानदारांनी बाधित क्षेत्रातील कामगारांना दुकानात घेतल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT