पुणे : एकीकडे कोरोना बाधितांची वाढती संख्या, तर दुसरीकडे अतिउत्साही कार्यकर्त्यांचा हेकेखोरपणा यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात काम करताना महापालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पोलिसांनी गल्लीबोळ बंद केली आहेत. त्यापुढे एक पाऊल टाकत या भागातील कार्यकर्त्यांनी स्वत:च्या स्तरावर ठिकठिकाणी गाड्या, बांबू लावून रस्ते बंद करून टाकल्याने बाधित रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोचणे, महापालिकेच्या सर्व्हेक्षण टिमपासून ते स्वच्छता करणाऱ्यासाठी येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शहरातील एकूण कोरोना बाधित रूग्णसंख्येपैकी भवानी पेठ, ढोलेपाटील, येरवडा आणि कसबा-विश्रामबाग वाडा या चार क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. तेथील या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी या क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील काही भाग हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. या क्षेत्रीय कार्यालयातंर्गत असलेल्या बहुतांश भागात अरूंद रस्ते आणि गल्लीबोळांचा भाग आहे. पोलिसांनी काही प्रमुख रस्ते वगळता सर्व रस्ते आणि गल्लीबोळ पत्रे लावून बंद केला आहे. तिथेपर्यंत ठिक होते. परंतु काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या पुढे पाऊल जाऊन स्वत:च्या स्तरावर अंतर्गत रस्तेही बांबू आणि गाड्या उभ्या करून बंद करून टाकले आहेत. त्याचा त्रास आता नागरिकांबरोबरच महापालिका कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
आणखी वाचा- पुण्यात सिंहगड रस्त्यानं दाखवला संयम; रोखला कोरोनाचा राक्षस
रुग्ण आढळल्यास त्या संपूर्ण परिसराचे सर्व्हेक्षण करण्यासाठी महापालिकेकडून टिम तयार करण्यात आल्या आहेत. या टिम घरोघर जाऊन तपासणी करीत आहेत. त्यांना उत्साही कार्यकर्त्यांमुळे घरोघर पोचणे अवघड झाले आहे. एवढेच नव्हे तर बाधित रुग्णांना घेऊन जाण्यास येणाऱ्या ऍम्ब्युलन्सला देखील पोचणे अवघड होऊ बसले आहे. लांब अंतरावर ऍम्ब्युलन्स उभी करावी लागत आहे. ठिकठिकाणी रस्ते अडविल्याने स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांना जाता येत नाही. परिणामी रस्त्यावरच नागरिकांना कचरा टाकावा लागत आहे. याबाबत तक्रारी करून देखील पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यातून ठिकठिकाणी वाद होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.
आणखी वाचा-पुण्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय; गेल्या तीन दिवसांत...
''मंडळाच्या कार्यकर्त्यांशी कोण भांडणार. विनाकारण बांबू बांधल्याने घरातून बाहेर पडणे देखील मुश्कील झाले आहे. सिलिंडर, औषधे आणण्यास देखील अडचण होत आहे.''
- वंदना काटे (नाव बदलले आहे)
आणखी वाचा-पुण्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय; गेल्या तीन दिवसांत...
''गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांची सफाई झालेली नाही. घरातील कचरा गोळा करण्यासाठी येणारी महापालिकेची गाडी सुद्धा आत येऊ शकत नाही. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र कचरा पडला आहे. मुख्य रस्ता बंद केल्यानंतर अंतर्गत रस्ते कार्यकर्त्यांनी बंद केल्यामुळे ही सगळी अडचण निर्माण झाली आहे. याकडे कोणी लक्ष देईल का?''
- सुभाष खांडगे ( रहिवासी)
मोठी बातमी : रांगेत न थांबता दारू मिळणार; पुण्यात ई-टोकनला सुरवात!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.