Overnight measures taken by the Public Works Department after the accident 
पुणे

अपघातानंतर एका रात्रीत उभ्या केल्या उपाय योजना

सकाळवृत्तसेवा

खडकवासला : खडकवासला ते खानापूर या रस्त्याची खूपच दुरवस्था झाली आहे. गोऱ्हे खुर्द येथील पुलाच्या कामाच्या खड्ड्यात दुचाकीसह तरुण पडला. स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराच्या माध्यमातून एका रात्रीत अपघाताच्या संदर्भाने विविध उपाय योजना सुरू केल्या आहेत. 

पानशेत रस्त्यावर गेली दीड वर्षांहून अधिक काळ रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून खराब रस्ता व खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी कायम अपघात होत आहेत. संथ वाहतुकीमुळे दररोज अनेक तास ट्रॅफिक जाम होत असते. कॉक्रीटीकरणाचे काम देखील मागील १५- २० दिवसांपासून या रस्त्याचे काम देखील बंद पडले आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी गोऱ्हे खुर्द येथील पुलाच्या कामाच्या खड्ड्यात दुचाकीसह तरुण पडला होता. सुदैवाने तो वाचला या पुलाचे काम गेली काही महिने रखडले होते. 

Budget 2021 : "सरकारने बजेटमध्ये थापा मारू नये", संजय राऊतांनी सांगितल्या बजेटबाबतच्या अपेक्षा 

गोऱ्हे खुर्द येथील पुलावर नुकताच खानापूर गावातील दुचाकी युवकाचा अपघात होऊन तो जायबंदी झाला होता. त्याठिकाणी देखील भेट देऊन पाहणी केली. खडकवासला गावातील मंडई चौकात व धरण चौकात तर खूप मोठे खड्डे झाले आहेत. गटाराचा भाग देखील खचला आहे. या ठिकाणी आणखी मोठा अपघात होऊ शकतो. याबाबत, संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदाराचा चांगलाच समाचार घेतला.

रस्त्याच्या दुरावस्थेच्या विरोधात शिवसेनेने आंदोलनाचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी तातडीने या भागातील समस्या समजून घेतल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता वैशाली भुजबळ व शाखा अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांनी ठेकेदार सागर बांदल यांना बरोबर घेऊन शिवसेना पदाधिकारी माजी तालुका प्रमुख संदिप मते, उपतालुका प्रमुख संतोष शेलार, विधानसभा प्रमुख नितीन वाघ, आशिष मते, अनिकेत मते, मुरलीधर मते, राहुल मते, उपसरपंच विक्रम धोंडगे, मा. सरपंच नारायणशेठ जावळकर, अनिल जावळकर, वैभव बिडकर, शिवकुमार कोणालीकर यांच्यासह संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. 

महत्त्वाची बातमी : इन्स्टाग्रामची मैत्री पडली महागात, मित्रानेच केली मैत्रिणीच्या घरी चोरी

यावेळी, या रस्त्यावरील काम सुरू असलेल्या धोकादायक ठिकाणी स्पॉट शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. चालू कामात पट्ट्या लावून बॅरिकेडिंग करायला सांगितले. जेथे काम चालू नाही. अश्या ठिकाणचे खड्डे पुढील आठवड्यात डांबराने भरून घेतले जातील असा विश्वास सागर बांदल यांनी दिला. हवेली पोलीस स्टेशनचे शांताराम राठोड व सत्यम काळे हे देखील उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT