Sandip-Gokhale 
पुणे

घराला लागलेल्या आगीत मालकाचा होरपळून मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे - भांडारकर रस्त्यावरील एका घरामध्ये बुधवारी पहाटे पावणेतीन वाजता लागलेल्या आगीमध्ये घरमालकाचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही.  

संदीप विनायक गोखले (वय ४६, रा. भांडारकर रस्ता) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोखले यांचे भांडारकर रस्त्यावरील गल्ली क्रमांक सहामध्ये राजेश्री नावाचे घर आहे. बुधवारी पहाटे पावणेतीन वाजता तेथे आग लागल्याची खबर स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलास दिली. काही मिनिटांतच एरंडवणा व कसबा येथील अग्निशामक दलाच्या गाडीसह जवान घटनास्थळी दाखल झाले. तेथील घरातून मोठ्या प्रमाणात धूर येत होता. तसेच, घर आतून बंद होते, त्यामुळे आग विझविण्यास अडचण येत होती.

नंतरही जवानांनी काही वेळातच आग विझविली. दरम्यान, अग्निशामक दलास आतमध्ये घरमालक असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी धुरातून वाट काढत घरामध्ये प्रवेश केला असता आत एक व्यक्ती भाजलेल्या अवस्थेत आढळून आली. जवानांनी त्यांना बाहेर काढून उपचारांसाठी तत्काळ खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टारांनी घोषित केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanchita Ugale: एक्स प्रियकराचा त्रास, आरोग्य समस्या की नैराश्य? अभिनेत्री संचिता उगलेने का संपवलं आयुष्य? मैत्रिणीनं सगळंच सांगितलं!

IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

Strait of Hormuz: शांतता करार झाला, पण होर्मुजमधून जहाजांची वाहतूक धोकेदायकच! आंतरराष्ट्रीय शिपिंग संघटनेने स्पष्ट केली भूमिका

National Volleyball Player Dies: राष्ट्रीय हॉलीबॉलपटू व प्रयोगशील शेतकरी रमेश सहालुगडे यांचे विहिरीत पडून अपघाती निधन

Pune Civic Schools PPP: आकांक्षा फाऊंडेशनसह अन्य संस्थांना मनपा शाळांचे दरवाजे खुले; गणेश बिडकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT