Oxygen-Bed 
पुणे

कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ऑक्सिजन बेड सज्ज!

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाची साथ पसरण्याच्या भीतीने महापालिकेने खबरदारी म्हणून आपल्याकडील रुग्णालये, दवाखान्यांसह खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन बेड तयार ठेवल्या आहेत. कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी साडेतीन हजार बेडची सोय केली आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या रुग्णालयांसह कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना प्राधान्य असेल. त्यानंतर गरजेनुसार खासगी रुग्णालयांत व्यवस्था राहणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यासह राज्याच्या काही भागांत कोरोनाची साथ वाढत असल्याचे आकडे रोज येत आहेत. या काळात रुग्ण संख्येत आणखी वाढ झाल्यास आरोग्य व्यवस्था अपुरी पडू नये, याची काळजी आतापासूनच घेतली जात आहे. त्यातून ससून रुग्णालयासह बाणेरमधील स्वतंत्र कोविड हॉस्पिटल, डॉ. नायडू, दळवी, लायगुडे, सोनवणे रुग्णालयांतील ऑक्सिजन बेडची नव्याने पाहणी करून ते रुग्णांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहे. त्याशिवाय यापूर्वी महापालिकेने ताब्यात घेतलेल्या विविध ७४ रुग्णालयांतील बेडचा आढावा घेऊन त्या ठिकाणी तीन हजार बेड उपलब्ध असतील, असे नियोजन करण्यात आले आहे. 

शहरात गेल्या १०-१२ दिवसांत रुग्ण वाढत असले तरी सध्या सुमारे सव्वादोन हजार रुग्णांना उपचार देण्यात येत आहेत. त्यातील ३०८ रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याने त्यांना तसे उपचार देण्यात येत आहेत. तर त्यातील १५४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

उत्पादकांशी चर्चा
शहरात ऑक्सिजन बेडची संख्या पुरेशी असली तरी याआधी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत नसल्याने रुग्णांवरील उपचारांत अडचणी आल्या होत्या. ऐन साथीच्या काळात ऑक्सिजन न मिळाल्याने आराेग्य यंत्रणेची धावपळ झाली होती. आता खबरदारी म्हणून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील, यासाठी उत्पादकांशी चर्चा करण्यात येत आहे.

ऑक्सिजन बेडची संख्या

  • ३००० - खासगी रुग्णालये
  • ५०० - महापालिका, ससून

शहरात रोजची रुग्ण संख्या एक हजाराच्या पुढे गेल्यास अत्यवस्थ रुग्णांना प्राधान्य द्यावे लागते. म्हणजे, मृत्यूदर कमी करण्यासाठी व्हेंटिलेटर आाणि ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी लागते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात बेडची सोय करीत आहोत. 
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT