पुणे

पद्मश्री डॉक्टर केके अग्रवाल यांचे कोरोनाने निधन

शरयू काकडे

पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले आहे. सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या ऑफिशिअल टिव्टिर अकाऊंटवरुन ही अधिकृत माहिती देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्यामुळे 3 दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.(Padma Shri and Ex-IMA President Dr KK Aggarwal passed away due to corona)

डॉ. केके अग्रवाल यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस 2 महिन्यांपुर्वीच घेतले होते तरी त्यांना कोरोना संसर्ग झाला. त्यानंतर त्यांना एम्समधील आसीयूमध्ये ठेवले होते. 28 एप्रिलला त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती.

''संकटाच्या वेळी त्यांनी हजारो लोकांना मदत केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रूग्णांवर त्यांनी विनामूल्य उपचार केले. कोरोना काळात ते वॉरियर्स म्हणून उभे राहिले, पण दुर्दैवाने त्याच कोरोनाबरोबर ते आयुष्याची लढाई हारले.''

डॉ. अग्रवाल हे ह्रदयरोग तज्ज्ञ म्हणून प्रसिध्द होते. त्यांनी हार्ट केअर फाऊंडेशन ऑफ इंडियाचे प्रमुख म्हणून काम पाहिले. 2005 साली त्यांना डॉ. बिसी रॉय हा पुरस्कार तर 2010 साली अग्रवाल यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2026 : कसबा ते दगडूशेठ... पुण्यात आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी

आजचे पंचांग 25 सप्टेंबर 2026! अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन; जाणून घ्या राहुकाळ आणि शुभ मुहूर्त

आजचे राशिभविष्य - 25 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2026

Hotel Gas Leakage : हॉटेलच्या किचनमध्ये गॅस गळती; सिलेंडरने घेतला पेट, कोंढवा बुद्रुकमधील घटनेत दोन कामगार जखमी

SCROLL FOR NEXT