habshi mahal 
पुणे

(व्हिडिओ) अफ्रिकेतून चारशे वर्षांपूर्वी आलेल्या गुलामाने उभारलेला महाल आजही टिकवून आहे सौंदर्य  

सिद्धार्थ कसबे

पिंपळवंडी (पुणे) : जुन्नर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर हापूसबाग येथे सुमारे चारशे वर्षांपूर्वी उभारलेला हबशी महाल तालुक्‍यातील ऐतिहासिक वस्तूंपैकी एक आहे. मात्र, या महालाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे.

जुन्नर हे जगातील एक प्राचीन शहर असून, त्याला सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. जगप्रसिद्ध बौद्ध लेण्या, नाणेघाट, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यासह सहा किल्ले परिसराच्या इतिहासाची साक्ष देतात. त्यातील हापूसबाग येथे सुमारे चारशे वर्षांपूर्वी उभारलेला हबशी महाल आजही पर्यटकांचे आकर्षण आहे. 

निजामाचा वजीर मलिक अंबर याने हा महाल उभारल्याचे सांगितले जाते. मलिक अंबर हा आफ्रिकेतील इथिओपिया या प्रांतात अबसीनिया या ठिकाणी राहत होता. या प्रांतातील लोकांना हबशी म्हणत. गरिबीमुळे त्याला लहानपणी गुलाम म्हणून विकण्यात आले. पराक्रम आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर मलिक पुढे निजामशाहीचा "वजीर' झाला. युद्धकलेसह तो उत्तम जलतज्ञही होता. त्याने "नहर-ऐ-अंबरी पाणी योजना' अनेक ठिकाणी राबवली. तिचे अवशेष जुन्नरमध्ये आजही काही ठिकाणी पाहायला मिळतात. 

मलिक अंबर याने बांधलेला हबशी महाल हा वास्तूशिल्पाचा उत्तम नमूना आहे. या महालाचे बांधकाम दगड व विटांमध्ये केले असून, तळमजला हा मुघल शैलीत उभारलेला आहे. मागील बाजूस एक पाण्याचा तलाव असून, त्यामुळे महालाच्या सौंदर्यात अधिक भर पडते. पूर्वी या महालाला चारी बाजूंनी तटबंदी होती. आज त्यातील फक्त दरवाजांचे अवशेष शिल्लक आहेत. 

या महालासारखे बांधकाम मेळघाटातील नरनाळा या किल्ल्यावर आपणास पहायला मिळते. या ठिकाणी काही काळ औरंगजेब बादशाहा राहिला असल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात. महालाच्या बाजूने अनेक मोठी चिंचेची झाडे असून हिरवीगार शेती व निसर्गसौंदर्यामध्ये हा महाल आजही त्याचे अस्तित्व टिकवून आहे. हे स्थान खासगी मालकीचे असल्याचे सांगितले जाते. मात्र, ऐतिहासिक ठेवा म्हणून त्याचे जतन करण्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे. 

गनिमीकाव्याचा जनक 
इथिओपिया हा डोंगराळ भाग असल्याने मलिक अंबरला पर्वतीय प्रदेशाची चांगली माहिती होती. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत व येथील जंगल युद्धासाठी उपयुक्त असून, त्याने येथील सैनिकांना गनिमीकाव्याचे प्रशिक्षण दिले. डोंगरकपाऱ्यांत मलिक अंबर याचे सैनिक शत्रूवर हल्ला चढविण्यात तरबेज असल्याचे सांगितले जाते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT