crime_jpg
crime_jpg 
पुणे

अत्याचार झालेल्या मुलीला घेऊन पालक पसार

संदीप घिसे

पिंपरी (पुणे)  : काळेवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. यामुळे तिचे पालक पुढील तपासणीसाठी मुलीला घेऊन ससून रुग्णालयात गेले. मात्र पहाटेच्या सुमारास पालक मुलीसह रुग्णालयातून पळून गेले. ही घटना सोमवारी उघडकीस आली. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आता वाढले आहे 

मुलीच्या गुप्तांगावर खाज येत असल्याने दिला तिच्या आईने वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांना वेगळ्या संशय आल्याने पीडित मुलीला पुढील तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले. ससून रुग्णालयातून वाकड पोलिस ठाण्यात सोमवार पहाटेच्या सुमारास याबाबत खबर देण्यात आली. या खबरीमध्ये पीडित मुलीचा पत्ता काळेवाडी येथील असल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिस रुग्णालयात जाण्यापूर्वीच पिडीत मुलीच्या पालकाने मुलीसह रुग्णालयातून पलायन केले. यामुळे बालिकेच्या या लैंगिक अत्याचार प्रकरणातील गूढ वाढले आहे. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT