pipeline.jpg 
पुणे

भामा आसखेड जलवाहिनीच्या कामासाठी नियमांचे तीन तेरा  

रूपेश बुट्टेपाटील

आंबेठाण (पुणे) : पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणावरून (ता. खेड) राबविण्यात येत असलेली जलवाहिनी योजना नव्याने होत असलेल्या चाकण-करंजविहिरे रस्त्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. अगदी रस्त्यालगत पाईप गाडले जात असल्याने गटाराविना रस्ता अशी या रस्त्याची ओळख राहणार आहे. याशिवाय पाणी निघून जाण्यासाठी असणाऱ्या मोऱ्यांच्या तोंडाला जलवाहिनीचे पाइप टाकल्याने मोऱ्या बंद झाल्या आहेत. करंजविहिरे ते आसखेड खुर्द पर्यंत बहुतांश रस्ता डोंगराच्या कडेने असल्याने उतारावरून येणारे पाणी गटार नसल्याने सरळ रस्त्यावरून वाहणार असल्याने भविष्यात हा रस्ता किती टिकेल ? याबाबत आताच साशंकता व्यक्त केली जात आहे.

भामा आसखेड धरणावरून पुण्याच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. खेड तालुक्यात या जलवाहिनीचा बराचसा भाग चाकण-वांद्रा या रस्त्याच्या कडेने जात आहे. एरवी रस्त्याच्या कडेने खोदाई करताना सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा अन्य विभाग खोदाई करणाऱ्यांना नियमावर बोट ठेवत कारवाईचा बडगा उगारते. विना परवानगी रस्ता खोदाई केली तर प्रसंगी सरकारी मालमत्तेचे नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई घेते. परंतु, या जलवाहिनीच्या कामात नियमांची पायमल्ली केली जात असताना केवळ सरकारी काम आहे म्हणून त्याकडे कानाडोळा केला जात असल्याची परिस्थिती आहे.

रस्त्याच्या दर्जानुसार प्रत्येक रस्त्याच्या कडेने खोदाई करताना रस्त्याच्या मध्यापासून ठराविक अंतर सोडून खोदाई केली जाणे अपेक्षित असते. परंतु, या ठिकाणी मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या अगदी कडेला खेटून खोदाई केली जात आहे. त्यामुळे रस्त्याचा काही भाग आणि संपूर्ण साईडपट्टी ही या जलवाहिनीवर राहणार आहे. भविष्यात जलवाहिनीची काही दुरुस्ती करायची असेल तर रस्ता तोडण्याशिवाय पर्याय नाही अशी अवस्था होणार आहे.

सध्या या जलवाहिनीला भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे म्हणून हे काम हे काम प्रचंड वेगाने सुरू आहे. अल्पावधीत हे काम संपवायचे असल्याने भविष्यातील या धोक्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. यापूर्वी गटारे असल्याने पाणी निघून जात होते. परंतु, आता गटारांच्या जागी रस्त्यालगत जलवाहिनी टाकली जात असल्याने पाणी निघणार कुठे? असा सवाल निर्माण होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून या जलवाहिनीचे काम प्रचंड पोलिस बंदोबस्तात सुरू आहे. परंतु, लोकांच्या भितीपोटी अल्पावधीत काम मार्गी लावण्यासाठी नियम पायदळी तुडवून करोडो रुपयांचा चुराडा यानिमित्ताने होणार आहे. याबाबत काही उपाययोजना केली नाही तर भविष्यात शिंदेवाडी सारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT