corona1
corona1 
पुणे

पुरंदरमधील शिवरीचा भक्कम बुरूज अखेर कोरोनाने ढासळवला  

योगेश कामथे

खळद (पुणे) : पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे आज एक २८ वर्षांचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले. गेल्या कित्येक दिवसांपासून अभैद्य असणारा शिवरीचा गड अखेर ढासळला. त्यामुळे येथील नागरिकांनी मोठी हळहळ व्यक्त केली.

आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हाॅट्सअपवर
          
सासवड- जेजुरी पालखी महामार्गालगत हे गाव असून, याच गावातून वीर भागात जाण्यासाठी रस्ता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर झाल्यापासून येथील गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, कोरोना दक्षता समिती व ग्रामस्थ गावचे रक्षण व्हावे, यासाठी रात्रीचा दिवस करीत होते. त्यातूनच आपल्या गावात कोरोना येण्यापासून आजपर्यंत त्यांनी लढा दिला, मात्र अखेर आज या ठिकाणी एक कोरोना पॉझिटिव्ह सापडला. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित कोरोना रुग्ण पुणे येथे कामासाठी ये- जा करत असल्याची माहिती मिळाली आहे. या रुग्णास तक्रारवाडी येथील कोवीड केअर सेंटर येथे ठेवण्यात आले आहे. त्याच्या संपर्कातील हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील जवळपास १२ व लो रिस्क कॉन्टॅक्टमधील ३७ नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे ग्रामसेविका ताई गायकवाड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT