PDCC Bank sakal
पुणे

पीडीसीसी बॅंकेने चालू वर्षी जिल्ह्यातील ६१,०६२ शेतकऱ्यांना पीक कर्ज केले वाटप

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी जानेवारी २०२२ अखेरपर्यंत जिल्ह्यातील ६१ हजार ६२ शेतकऱ्यांना ३८५ कोटी ८५ लाख १० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी जानेवारी २०२२ अखेरपर्यंत जिल्ह्यातील ६१ हजार ६२ शेतकऱ्यांना ३८५ कोटी ८५ लाख १० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) (PDCC Bank) चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी (Crop) जानेवारी २०२२ अखेरपर्यंत जिल्ह्यातील ६१ हजार ६२ शेतकऱ्यांना ३८५ कोटी ८५ लाख १० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप (Loan Distribute) केले आहे. पीक कर्जाचा लाभ घेतलेल्यांमध्ये ९ हजार १६६ नवे शेतकरी आहेत. रब्बी हंगामातील कर्ज वाटपाच्या एकूण उद्दिष्टाच्या ६६.५२ टक्के कर्ज वाटप आतापर्यंत पूर्ण झाले आहे.

गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील कर्ज वाटपाच्या तुलनेत यंदा २३ कोटी ७२ लाख ३२ हजार रुपयांचे अधिक वाटप झाले आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ३६२ कोटी १२ लाख ७८ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप पूर्ण झाले होते, असे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.

जिल्ह्यात सर्वाधिक ५८ कोटी १९ लाख ४४ हजार रुपयांचे पीक कर्ज हे आंबेगाव तालुक्यात तर, सर्वांत कमी तीन कोटी ७९ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज वाटप वेल्हे तालुक्यात झाले आहे. दरवर्षी १ आॅक्टोबरपासून रब्बी हंगामातील पिकांसाठी जिल्हा बॅंकेच्यावतीने पीक कर्ज वाटप सुरू केले जाते. ते ३१ मार्चपर्यंत वाटप केले जाते.

जिल्हा बॅंकेने चालू वर्षीच्या रब्बी हंगामासाठी ५८० कोटी सहा लाख रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात हेच उद्दिष्ट ६१५ कोटी १६ लाख रुपयांचे ठेवण्यात आले होते. बॅंकेने चालू वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी मिळून २ हजार ३६० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्यापैकी आतापर्यंत या दोन्ही हंगामात मिळून २ हजार ११० कोटी १९ लाख ९४ हजार रुपयांचे प्रत्यक्ष कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. कर्ज वाटपाचे हे प्रमाण ८९.४२ टक्के झाले आहे.

कर्जाचा लाभ घेणारे तालुकानिहाय शेतकरी

  • आंबेगाव --- १० हजार ७४७

  • बारामती --- २ हजार ९६६

  • भोर --- २ हजार ७८५

  • दौंड --- २ हजार ९५१

  • हवेली --- ९३४

  • इंदापूर --- ३ हजार ८४५

  • जुन्नर --- ११ हजार ४२२

  • खेड --- १२ हजार ४५३

  • मावळ --- ३ हजार ४६

  • मुळशी --- ३ हजार ३१

  • पुरंदर --- ३ हजार ३५८

  • शिरूर --- २ हजार ६६९

  • वेल्हे --- ८५५

  • एकूण --- ६१ हजार ६२

तालुकानिहाय कर्ज वाटप रक्कम (रुपयांत)

  • आंबेगाव --- ५८ कोटी १९ लाख ४४ हजार

  • बारामती --- २६ कोटी ७१ लाख २६ हजार

  • भोर --- १६ कोटी २५ लाख ११ हजार

  • दौंड --- ३० कोटी ८० लाख १५ हजार

  • हवेली --- ७ कोटी ४२ लाख ८९ हजार

  • इंदापूर --- ४५ कोटी ३ लाख ५८ हजार

  • जुन्नर --- ५७ कोटी ४० लाख ५४ हजार

  • खेड --- ५६ कोटी ७६ लाख १९ हजार

  • मावळ --- १७ कोटी ८२ लाख ३८ हजार

  • मुळशी --- १५ कोटी ४८ लाख ११ हजार

  • पुरंदर --- २३ कोटी ४७ लाख ३४ हजार

  • शिरूर --- २६ कोटी ६८ लाख २१ हजार

  • वेल्हे --- ३ कोटी ७९ लाख ९० हजार

  • एकूण --- ३८५ कोटी ८५ लाख १० हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजार वाढीसह उघडला; निफ्टी 80 अंकांनी वधारला, कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

IND vs AUS : रोहित शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती घेणार? BCCI ने स्पष्ट केली भूमिका; ही त्यांची शेवटची मालिका...

Zilla Parishad Politics : जिल्हा परिषदेसाठी कायपण! ‘सरकार’, ९६ कुळी, म्हणून घेणारे होणार ‘कुणबी’; स्वतःसह सौभाग्यवतींचेही काढले दाखले

Missing Lawyer Case : तीन महिन्यांपासून वकील बेपत्ता, शिंदे गटाच्या 'या' आमदारावर गंभीर आरोप; किशोरी आरडे म्हणाल्या, 'माझ्या पतीच्या जीवाला..'

Latest Marathi News Live Update : झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणासंदर्भात एसआयटी/सीआयडीने अटक केलेल्या श्यामकानु महंता, सिद्धार्थ शर्मा आणि इतरांना आज न्यायालयात हजर करणार

SCROLL FOR NEXT