Penalty against organization for postponement of release of Arsenic Album-30 
पुणे

अर्सेनिक अल्बम-30 वापटला स्थगिती मागत होते; कोर्टाने घेतला मोठा निर्णय

सकाळवृत्तसेवा

पुणे : रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी देण्यात येत असलेल्या 'अर्सेनिक अल्बम - 30' या गोळ्यांचे वाटप करण्यास स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या एका धर्मादाय संस्थेला न्यायालयाने चांगलाच चाप लावला आहे. कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात संबंधित संस्थेने मानवाधिकाराच्या नावाने प्रसिद्धी मिळविण्यासाठी दावा दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवला, असे स्पष्ट करुन या संस्थेला न्यायालयाने दहा हजार रुपयांचा दंड सुनावला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. दंडाची रक्कम पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे भरण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी चिंचवड येथील एका धर्मादाय संस्थेने पुणे महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याविरुद्ध मानव अधिकार संरक्षण अधिनियम 1993 च्या कलम 30 नुसार दावा दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने होमिओपॅथी फेटाळलेली असतनाही कोविड - 19 साठी याचा वापर केला जातो आहे.

पुण्यातील दोन खासदार देशातील टॉप फाईव्ह परफॉर्मर! वाचा सविस्तर रिपोर्ट

होमिओपॅथी अंतर्गत वाटप करण्यात येत असलेल्या अर्सेनिक अल्बम - 30 या गोळ्यांचा वापर करण्याचे आवाहन लोकांना केले जात आहे. त्यामुळे नागरिकांची मेडीकलमध्ये गर्दी होते आहे. या सर्वात सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाचे पालन होत नाही. या गोळ्यांचा वापर नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारा आहे. त्यामुळे त्यांच्या वाटपाला स्थिगिती देण्यात यावी, असे या दाव्यात संबंधित संस्थेने नमूद केले होते. 

सलग सोळाव्या दिवशीही इंधन दरवाढीचे मीटर सुसाट

कोरोना संबंधात असलेला दावा तात्काळ दाखल करून घेत न्यायालयाने त्यावर सुनावणी घेतली. मात्र त्यातील मागण्यांचा विचार करता न्यायालयाने तो फेटाळून लावत संस्थेला दणका दिला आहे. एवढेच नाही तर सध्या केवळ एकाच शिफ्टमध्ये काम चालत असतानाही न्यायालयाचा वेळ वाया घालवला म्हणून दहा हजार रुपयांचा दंडही केला आहे.

खरिप हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांची कोंडी

निकालात नमूद निष्कर्ष : 
- संस्थेने प्रसिद्धी मिळविण्यासाठी दावा दाखल केला
- त्यामुळे न्यायालयाचा वेळ वाया गेला
- अर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांवर बंदी नाही
- गोळ्यांचा वापर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी
- गोळ्यांचा कोणाला त्रास झाल्याचे पुरावे नाहीत
- न्यायालय तातडीच्या दाव्यांवरील सुनावणीत  व्यस्त


जय शिवराय : राजगडावरील दुरुस्तीचे काम सुरू, पुरातत्व विभागाने घेतली दखल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT