वानवडी - दिव्यांग व्यक्ती मास्क बनवित आहेत.  
पुणे

दिव्यांग व्यक्तींना मिळाला लॅाकडाउनमध्ये रोजगार; कसा ते वाचा

संदिप जगदाळे

हडपसर - लॅाकडाउनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून दिव्यांगांचे छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. परिणामी त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस परिस्थिती बदलण्याची शक्यता नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडण्याची भिती आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमधील सध्याची मागणी लक्षात घेऊन दिव्यांगांकडून कापडी मास्क तयार करण्यात येत आहेत. दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स व बडवे इंजिनीरिंग यांच्या माध्यमातून अनेक दिव्यांग लोक रोज हजारो मास्क तयार करत आहेत. दिव्यांग लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी यामाध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रघुनाथ येमूल व श्रीकांत बडवे व बडवे इंजिनीरिंगचे हर्षद फोफळे यांनी दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. त्यांना अपंगकल्याणकारी संस्था आणि सक्षम ची साथ मिळत आहे. वानवडी येथील अपंगकल्याणकारी संस्थेत दिव्यांगांना मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण दिले असून शहरात १२५ दिव्यांग व्यक्ती मास्क बनवत आहेत. तसेच अनेक दिव्यांगांना घरात शिलाई मशीन उपल्बध करून दिल्या असून घरूनच ते मास्क बनविण्याचे काम करू लागले आहेत. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला दिवसाला ३०० ते ४०० रूपये मिळत आहे. चाकण येथील अनेक कंपन्यांसोबत करार झाला असून या कंपन्या दिव्यांगानी तयार केले मास्क विकत घेत आहेत. 

अपंगकल्याणकारी संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. मुरलीधर कचरे म्हणाले, दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स व बडवे इंजिनीरिंग चेंबरच्या वतीने ना नफा- ना तोटा या तत्वावर दिव्यांगाना चार पैसे मिळावेत, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. अनेकदा दिव्यांगांनी तयार केलेली उत्पादने दर्जेदार असतात. मात्र, त्याला बाजारपेठ उपल्बध नसते. या निमित्ताने त्यांनी बनविलेली मास्क विकत घेऊन योग्य ग्राहकांपर्यंत ना नफा-ना तोटा या तत्वावर विकली जातात. त्यामुळे दिव्यांगांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. 

व्यांग लाभार्थी गहिनीनाथ नलावडे म्हणाले, सध्या मंदिचा काळ आहे. या काळात हाताला काम नव्हते. त्यामुळे आर्थीक चणचण भासत होती. मात्र मास्क बनविण्याचे काम मिळाल्याने उदरर्निवाहाचा प्रश्न मार्गी लागला आहे. सुरवातीला संस्थेने आम्हाला मास्क बनविण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच शिलाई मशीन उपल्बध करून दिल्या आहेत. दिवसभरात या माध्यमातून आम्हाला ३०० ते ४०० रूपये मिळतात. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dahi Handi: गोविंदांसाठी खुशखबर! सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे संरक्षण, २ लाखांपर्यंत उपचार खर्च, विशेष विमा कवच लागू

Ketan Agrawal Lohgad Case : सिया, चेतनच्या प्रेमाबाबत भावाचा पोलिसांकडे खुलासा, लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; साहिल गोयलची कसून चौकशी

Army Jawan Success : जिद्द असावी तर अशी! निवृत्तीनंतर साताऱ्याच्या माजी सैनिकानं एकाच वर्षात 'क्रॅक' केल्या तब्बल 12 सरकारी परीक्षा; एकामागून एक कशा दिल्या Exam?

Latest Marathi News Live Update : राममंदिरात दानचोरी आणि जमीन गैरव्यवहार प्रकरणात अध्यक्षांच्या राजीनाम्याची शक्यता

Pune Traffic Update : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर पडला बंद; वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा, प्रवाशांना कोंडीचा नाहक त्रास

SCROLL FOR NEXT