Palkhi.jpg 
पुणे

हडपसमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन

संदीप जगदाळे
हडपसर (पुणे)  : वारकरी संप्रदायाची परंपरा असणाऱ्या ऐतिहासिक अशा श्री. संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. पंरपरेनुसार आज मंगळवारी (ता. १६) दोन्ही पालख्या हडपसरला विसाव्यासाठी येणार होत्या. मात्र ही पंरपरा खंडीत होऊ नये म्हणून हडपसरवासियांनी दोन्ही पालख्यांच्या विसावा स्थळी आरती करून ज्ञानेश्र्वरी व गाथेचे आणि पादुकांचे पूजन केले. 
याप्रसंगी पालखी चोपदार रामभाऊ रंधवे, नगरसेविका वैशाली बनकर, मारूतीआबा तुपे, योगेश ससाणे, उज्वला जंगले, माजी नगरसेवक सुनिल बनकर, विजय देशमुख, योगेश गोंधळे, डॅा. शंतनू जगदाळे, सचिन पवार, विलास शिंदे, बाळासाहेब केमकर, सुभाष जंगले, प्रमोद रणवरे, अनिल शिंदे, बच्चूसिंग टाक, पोलिस निरिक्षक हमराज कुभांर उपस्थित होते. यावेळी गोंधळेनगर येथील विठ्ठल-रूख्मिणी भजनी मंडळ यांचे भजन झाले.
प्रत्येक वारकरी व भाविक ज्ञानोबा-तुकाराम या गजरासोबतच एक मागणी करत असेल ती म्हणजे हे कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि पुढच्या वर्षी तरी वारीची परंपरा उत्साहात आणि आनंदात साजरी होऊ देत. प्रत्येक हडपसरवासीय दरवर्षी दोन्ही पालख्यांचे मोठया उत्साहात स्वागत करण्यासाठी सज्ज असायचे. वारक-यांना भोजनासह विविध सेवा देण्यासाठी सज्ज असायचे. मात्र यंदा पायी पालखी सोहळा रद्द झाल्याने हडपसर व परिसरातील लाखो नागरिक नाराज आहेत. 
पालखी सोहळ्याचे चोपदार रामभाऊ रंधवे म्हणाले, आषाढातली पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातल्या सर्वांत मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोना विषाणूची साथीमुळे पायी आषाढी वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे  वारकरी व भाविक नाराज झाले आहेत. मात्र टाळेबंदीमुळे व कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने दिलेले सर्व नियम पाळणे सर्वांना बंधनकारक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy : भारतीय संघात परतला अन् Rinku Singh सूसाट सुटला... १५ चेंडूंत ६८ धावांसह ठोकले वादळी शतक

Kalyan News: धक्कादायक! १७व्या मजल्यावर क्रेन कोसळून मोठी दुर्घटना; एका मजुराचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

त्यांचं शरीर साथ देत नव्हतं... कसे होते इरफान खान यांचे शेवटचे दिवस; डिझायनर म्हणाली, 'कॅन्सर झाल्यानंतर त्यांनी कधीही....

थरारक प्रसंग! आंबेनळी घाटात कार थेट 100 फूट दरीत कोसळली; 10 वर्षांच्या मुलाच्या कॉलमुळे वाचले पाच जणांचे प्राण

Kolhapur Muncipal : महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा; समन्वय ठेवा, नाराजांची समजूत काढा – रविंद्र चव्हाण

SCROLL FOR NEXT