लसीकरण 
पुणे

पुण्यात लसीकरण केंद्रांवर पुन्हा गोंधळ

टोकन मिळूनही अनेक जण लशीविनाच; नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लस(Vaccine) कमी आणि टोकनचे (Token) वाटप जास्त... परिणामी गोंधळ, असे चित्र शुक्रवारी काही लसीकरण केंद्रांवर(vaccination Center) पुन्हा एकदा पाहावयास मिळाले. लशींचा पुरवठा कमी होत असल्याने आजही अनेक केंद्रांवरून नागरिकांना निराश होऊन परत जावे लागले. (people Return Without Vaccine from vaccination center in Pune)

राज्य सरकारकडून गुरुवारी दहा हजार लशींचा पुरवठा महापालिकेला झाला. त्यामध्ये दुसऱ्या डोसाला प्राधान्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यामुळे आज महापालिकेच्या सर्वच केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर सकाळपासूनच गर्दी झाली होती. काही केंद्रांवर तर सकाळी सात वाजल्यापासून रांगा लागल्या होत्या. शहराच्या मध्यवर्ती भागातील केंद्रांवर नागरिकांना टोकन उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र केंद्रावर सकाळी दहा वाजता लस उपलब्ध झाली. लस कमी आणि टोकनचे वाटप जास्त केल्यामुळे नंबर आल्यानंतर लस उपलब्ध नाही, असे सांगण्यात आल्याने नागरिकांना परत जावे लागले. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी महापालिकेने लसीकरण केंद्राची संख्या एकने वाढविल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र या केंद्रावर ही लशीचा पुरेशा साठा नसल्यामुळे अनेकांना तासन्‌तास थांबल्यानंतरही लस मिळू शकली नाही. परिणामी आजही अनेक केंद्रांवर गोंधळाचे चित्र होते.

''लसीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार आज दुपारी तीन ते पाच दरम्यानचा स्लॉट दिला असल्याने दुपारी अडीच वाजता बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण शाळा येथे पोचलो; पण आम्हाला बाहेरच थांबवून लस संपल्याचे सांगितले. हा काय प्रकार असावा, कोण याची दखल घेणार आहे का नाही?''

- संजय वेलणकर, नागरिक

''दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर सकाळी साडेआठ वाजताच आलो. टोकनही घेतले. परंतु नंतर लस संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे फुकट वेळ वाया गेला. जेवढे डोस उपलब्ध होतील, तेवढेच टोकन वाटून उर्वरित लोकांना जाण्यास सांगितल्यास त्यांचा वेळ तरी वाचेल.''

- विजय कोल्हापुरे, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT