पुणे

सेवक म्हणून जनतेची कामे करा : दत्तात्रेय भरणे

राजकुमार थोरात

वालचंदनगर : नवनिर्वार्चित सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी मिळालेल्या खुर्चीचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लावून जनतेच्या विकासासाठी सेवक म्हणून काम करण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले. 
भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे आमदार भरणे यांच्या हस्ते नवनिर्वार्चित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, सदस्य अभिजित तांबिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, छत्रपती माजी संचालक अॅड. लक्ष्मणराव शिंगाडे उपस्थित होते. यावेळी भरणे यांनी सांगितले की, निवडणूकीमध्ये विजयी झालेले उमेदवार जनतेचे सेवक असतात, मालक नसतात.  सेवक या नात्याने सर्वसामान्य, गोरगरीबांचे कामे मार्गी लावावतीत. सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदमानून गावाचा विकास आराखडा तयार करावा. गावातील सर्व नागरिकांनी मतभेद विसरुन गावाच्या विकासासाठी एकत्र यावे. गटातटाचे राजकारण न करता  आगामी लोकसभा, विधानसभा निवडणमकीमध्ये सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन भरणे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 14 पैकी 10 ग्रामपंचायतीवर वर्चस्व असल्याचा दावा केला.

विरोधक पाण्याचे राजकारण करतात. 

यावेळी आमदार भरणे म्हणाले, धरणामध्ये समाधानकारक पाणी साठा झाल्यापासुन कालवे सुरु आहेत. एका दिवसामध्ये पाण्यासाठी दुसरा कालवा अथवा पाइपलाइन करणे शक्य नसल्याने धरणे फुल्ल भरल्यानंतर पाणी नदीमध्येच सोडावे लागते. मात्र विरोधक कर्नाटकला पाणी गेल्याचा आरोप करीत आहेत. तालुक्यामध्ये पाऊस पडला नाही, यामध्ये आमदाराची काय चूक आहे का? कालव्याचे पाणी उभ्या पिकांना देण्याचे काम सुरु आहे. पाऊस नसल्यामुळे तलाव कोरडे पडले आहेत. पाऊस असता तर तलावामध्ये पाणी सोडण्यात आले असते. तालुक्यातील सिचंन क्षेत्रामध्ये वाढ झाली असुन विरोधक पाण्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT