petro price on 95 and disel price 85 in pune hike in Price 
पुणे

पेट्रोलच्या शतकाला पाच रुपयांची कमी ; पुण्यात डिझेल ८४.६८ रुपये लिटर

सकाळवृत्तसेवा

पुणे,: प्रतिल टर ९३ रुपयांचा उच्चांकी टप्पा गाठल्यानंतरही पेट्रोल दरवाढीची घोडदौड अजूनही सुरूच आहे. सोमवारी शहरात पेट्रोलची किंमत ९५ रुपयांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे प्रतिलिटर किमतीचे शतक झळकविण्यासाठी पेट्रोलचे दर फक्त पाच रुपयांपासून दूर आहेत.

अनलॉकनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढतच आहेत. गेल्या वर्षाअखेरीस दरांत काहीशी घट झाली होती. मात्र जानेवारीपासून भडका वाढतच आहे. अगदी या महिन्याच्या सुरवातीपासून वाढत्या किंमती लक्षात घेता, फेब्रुवारीअखेर पेट्रोल १०० रुपये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिसेंबरनंतर इंधनाचे दर कमी होतील, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला होता. तसेच वाहन चालकांना या दरांमुळे बसणारी छळ पाहता, राज्य किंवा केंद्र सरकार कर कमी करतील, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात त्याच्या उलटे होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सोमवारी इतर शहरांतील पेट्रोलच्या किंमती -
परभणी - ९७.५७
नांदेड - ९७.४७
जालना - ९६.४६
रत्नागिरी - ९६.०६
जळगाव- ९६.०५

पुण्यातील इंधनाचे दर
पेट्रोल - ९५.१० प्रतिलिटर
डिझेल - ८४.६८ प्रतिलिटर
सीएनजी - ५५.५० प्रतिकिलो

आणखी वाचा - पूजा चव्हाणच्या हत्येचा कट? भाडेकरारापासून आत्महत्येचा घटनाक्रम काय सांगतो?

''पूर्वी इंधनाचे दर एक दोन रुपयांनी वाढले तर विरोधक मोठ्या प्रमाणात आंदोलने करीत. मात्र, आता एवढ्या किंमती वाढूनही पूर्वीसारखे आंदोलन होत नाहीत. केंद्रांत आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सत्ता असल्याने हे चित्र आहे. आंदोलनांपेक्षाही सध्या किमती कमी होणे गरजेचे आहे.''
- आनंदा पाटोळ, दुचाकीधारक नोकरदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT