Petrol diesel prices increase by regularly in last 8 days
Petrol diesel prices increase by regularly in last 8 days 
पुणे

पेट्रोल दर वाढीने वाहनचालक हैराण सलग आठव्या दिवशी वाढले दर

सकाळवृत्तसेवा

पुणे : कच्च्या तेलाचे दर कमी झालेले असले तरी गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर रोजच वाढत चालले आहेत. आज पुण्यातील पेट्रोलचा दर ८२. ४३ रुपयांवर जाऊन पोहोचला असल्याने वाहन चालक हैराण झाले आहेत. दरम्यान, सोमवारपासून हे दर स्थिर रहाण्याची शक्यता आहे, असे आॅल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लाॅकडाऊन मुळे पुण्यातील व्यवहार सुरळीत होत असताना रस्त्यावरील वाहतूक वाढत आहे. संचारबंदीच्या काळात पुण्यातील अनेक रस्ते, बाजारपेठ, कार्यालय बंद असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता तुरळक वाहतूक  सुरू होती. तसेच पेट्रोल विक्रीवर ही निर्बंध आणले गेल्यानेही नागरिक विनाकारण गाडी बाहेर काढायला नकोच यावर ठाम होते. एप्रिल व मे महिन्यात सलग ४६ दिवस पेट्रोलचे दर ७६. ०७ रुपये, तर -डिझेलचे दर ६४.९७ पेशावर स्थिर होते. पण त्याचा फायदा वाहनचालकांना घेता आला नव्हता. तीन जून नंतर पुण्यातील व्यवहार सुरू झाले आहेत, सर्व प्रकारचे दुकाने उघडली आहेत, तर कमी मनुष्यबळावर खासगी कार्यालये सुरू झाली आहेत, मात्राच काळात इंधन वाढीचा फटका पुणेकरांना बसला आहे. 
-----------
ग्रामीण भागातील गरिबी हटवण्यासाठी केंद्राची जीवोन्नती योजना; जाणून घ्या पात्रता
-----------
अनलॉक'ला आता डेडलॉक नको; अनलॉककडून लॉकडाऊन हा उलटा प्रवास न परवडणारा
-----------
रुपयाच्या तुलनेत डाॅलर मजबूत होत असल्याने अांतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रती बॅलर  ४५ रुपयांपर्यंत गेली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत गेले आहेत. मात्र, कच्च्या तेलाचे उत्पादन वाढत असल्याने सोमवारपासून इंधनाचे जर स्थिर रहातील. इतक्यात हे ददर कमी होण्याची शक्यता कमी आहे, असे आॅल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले. 

२२ लाख लीटर इंधन विक्री
साधारण स्थितीत पुण्यात रोज ३० लाख लीटरची पेट्रोल विक्री होते. लाॅकडाऊन काळात ती कमी होऊन केवळ ३ लाख लीटर वर आली होती. गेल्या काही दिवसांपासून इंधन विक्री वाढली आहे. सध्या रोज किमान २० ते २२ लाख लीटर पेट्रोल विक्री होत आहे. स्थिती पूर्ववत होत असल्याचे, दारूवाला यांनी सांगितले. 

७ जून 
पेट्रोल 78.67
डिझेल 67.55

८ जून
पेट्रोल 79.25
डिझेल 68.11

९ जून
पेट्रोल 79.77
डिझेल 68.65

१० जून
पेट्रोल 80.15
डिझेल 69.07

११ जून 
पेट्रोल 80.73
डिझेल 69.62

१२ जून
पेट्रोल 81.27
डिझेल 70.17

१३ जून
पेट्रोल 81.84
डिझेल 70.71

१४ जून
पेट्रोल 82.43
डिझेल 71.31

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT