PFI PMC Sakal
पुणे

PFI Row : कोरोनाकाळात पुणे महापालिकेने घेतली होती PFIची मदत; झाला होता करार

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) वादग्रस्त पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या कार्यालयावर छापे टाकल्यानंतर १०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर या संस्थेकडून राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी कारवाया करण्यात येणार असल्याचे खुलासे झाले असून या संघटनेशी पुणे महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी करार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

(PFI Contract With PMC)

कोविड काळात २०२० मध्ये मृतांचा आकडा वाढल्याने मुस्लीम समाजातील व्यक्तीचे दफनविधी करण्यासाठी पालिकेने PFIची मदत घेतली होती. महापालिका आयुक्तांच्या आदेशाने जवळपास दोन महिने PFI या संस्थेशी पालिका कनेक्ट होती. मात्र तात्कालीन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सत्ताधारी भाजपला सांगितल्यानंतर पालिकेने हा करार रद्द केला होता.

दरम्यान, कोरोना काळात मृतांचा आकडा वाढल्याने मुस्लीम व्यक्तींच्या मृतहेदाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने या संस्थेची मदत घेतली होती. महापालिकेत त्यावेळी भाजपची सत्ता होती. त्यानंतर तात्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून तातडीने PFI सोबतचा करार रद्द केला.

१३ एप्रिल २०२० रोजी महापालिकेने हा करार केला होता. त्यानंतर २ जून २०२० रोजी हा करार रद्द करण्यात आला होता. ज्यावेळी PFIचा महापालिकेशी करार होता त्यावेळी राझी अहमद खान हा व्यक्ती या संस्थेचे काम पाहत होता. तो सध्या NIAच्या ताब्यात आहे. तर ATS कडून अधिक तपास सुरू आहे.

काय आहे PFIचे प्रकरण?

टेरर फंडिंग आणि दहशतवादी कारवायांच्या संशयातून NIAने PFIच्या कार्यालयावर छापे टाकले होते. त्यामध्ये १०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतरच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भारताला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवण्याचं PFIचं उद्दिष्ट असून भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय त्यांच्या टार्गेटवर असल्याचं तपासून समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तान 'सुवर्ण' लढत! श्रीलंकेला लोळवून श्रेयस अय्यरचा संघ फायनलमध्ये; केव्हा होणार हा महामुकाबला?

पत्ता बदलण्यासाठी Form 8 भरला अन् कुटुंबातील सहा सदस्यांची नावेच गायब; SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी

Wicknell Chivayo Death : झिम्बाब्वेत हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जगप्रसिद्ध उद्योगपती विकनेल चिवायोसह सहा जणांचा मृत्यू

Jio ची मोठी ऑफर! 6 महिन्यांचा रिचार्ज आणि 14GB डेटा मिळणार फ्री; 'या' युझर्सना होणार फायदा...

Latest Marathi News Live Update : MPSC विद्यार्थ्यांचं 2 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT